IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या पोलिस विभागात सध्या राजीनामासत्र सुरू आहे. बिहारचे सिंघम अशी ओळख असणारे शिवदीप लांडे यांनी भारतीय पोलिस सेवेतून राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यावर तर हेच दिसून येत आहे. परंतु मोठा प्रश्न हा आहे की, बिहार पोलिस शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याचा धक्का सहन करेल, की त्यांना कसंही करून राजीनामा मागे घेण्यास तयार केले जाईल.
ही बातमी लिहिली जाईपर्यंतरी शिवदीप लांडे कर्तव्यावर होते. हा मुद्दा यामुळे उपस्थित होत आहे, कारण दरभंगा येथून आपल्या ड्यूटीवरून निघण्याआधी आयपीएसचा राजीनामा देवून निघालेल्या काम्या मिश्रा यांचा राजीनामा आतापर्यंत मंजूर केला गेलेला नाही. त्यांचा राजीनामा ४५ दिवसांपासून स्वीकरलेला नाही.
दरभंगा येथील पोलिस(Police) अधीक्षक काम्या मिश्री यांनी ५ ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करत, सरकारला तसे पत्र पाठवले होते. परंतु आता जवळपास दोन महिने झाले आहेत, तरीही काम्या मिश्रा यांचा राजीनामा मंजूर केला गेलेला नाही. तर, दुसरीकडे सरकारला राजीनाम्याचे पत्र पाठवून काम्या मिश्री या प्रदीर्घ रजेवरही गेलेल्या आहेत. राजीनामाच्या कारण सांगताना त्या म्हणाल्या होत्या की, कौटुंबीक कारणास्तव हा राजीनामा देत असून, आता कुटुंबाला वेळ देत आहे. आता त्या राजीनामा मंजूर होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
याशिवाय पूर्णिया आयजी कार्यालायने आयपीएस शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याच्या वृत्तास दुजोरा दिलेला आहे. शिवदीप लांडे(Shivdeep Lande) यांनी आपले राजीनामा पत्र पोलिस मुख्यालयास पाठवले आहे. आता हे पाहावे लागणार आहे की बिहार पोलिस मुख्यालय लांडे यांचा राजीनामा स्वीकार करणार की नाही?
शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये, 'एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो., असे म्हटले आहे.
तर मराठी IPS शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिला असला तरी ते महाराष्ट्रात परत येणार नाहीत. त्यांनी बिहारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार हेच माझे कार्यस्थान राहील, असे ते म्हणाले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.