Uday Samant Sarkarnama
विदर्भ

Uday Samant : काँग्रेसच्या बड्या नेत्याला शिंदेंच्या शिलेदाराचा टोला; म्हणाले, "तुमच्या पक्षात काय सुरू आहे ते आधी बघा..."

Uday Samant on Congress : माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार रोज नवनवे विषय घेऊन येतात आणि महायुतीच्या नेत्यांवर तुटून पडतात. अलीकडेच त्यांनी शिवसेनेत नवा उदय होणार असल्याचे सांगून संशयाचे वातावरण निर्माण केले होते.

Rajesh Charpe

Nagpur News, 07 Feb : माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) रोज नवनवे विषय घेऊन येतात आणि महायुतीच्या नेत्यांवर तुटून पडतात. अलीकडेच त्यांनी शिवसेनेत नवा उदय होणार असल्याचे सांगून संशयाचे वातावरण निर्माण केले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर शुक्रवारी (ता.07) राज्याचे उद्योग मंत्री तसेच शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वडेट्टीवारांनी त्यांच्या काँग्रेस पक्षात काय सुरू आहे हे पहाण्याचा सल्ला सामंत यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांची आता भाजपला गरज राहिली नाही.

ते वारंवार नाराज होत असल्याने सामंतांना उपमुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा वेडट्टीवारांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा 20 आमदार घेऊन सामंत बाहेर पडणार असल्याचे वक्तव्य केले होते.

यावर उदय सामंत ॲडव्हांटेज विदर्भ या कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते तेव्हा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारणात आलो आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करीत आहोत. त्यांना त्रास होणार नाही अशी कुठलीही कृती माझ्याकडून होणार नाही. आम्ही बालिश नाही, असं ते म्हणाले.

तर विजय वडेट्टीवार माझे राजकारणाच्या पलीकडचे मित्र आहेत. मात्र त्यांना मार्गदर्शन करणारे लोक बरोबर नाहीत. आधी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरून काय वाद सुरू आहे हे बघावे. त्यांनी आपल्या पक्षांतर्गत वाद आधी सोडवावा. उदय सामंत यांच्याबरोबर किती आमदार आहेत, त्यांचे काय सुरू आहे यापेक्षा वडेट्टीवारांनी त्यांच्या काँग्रेस पक्षात काय सुरू आहे हे बघावे, असा टोला सामंत यांनी लगावला.

महायुतीचे 237 आमदार विजयी होऊन सत्तेत आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यात पुन्हा सत्ता येण्याचे काही चिन्हे दिसत नाहीत. न्यायालयात एखादी बाब चालू असताना त्यावर बाहेर भाष्य आणि ट्विट करणे योग्य नाही. न्यायिक व्यवस्थेवर कायम आक्षेप घ्यायचा, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेणे ही काही लोकांची फॅशन बनली आहे. त्यामुळे आव्हाडांवर मला जास्त बोलायचे नाही असेही उदय सामंत, म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT