Shivsena UBT : ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून ठाकरेंच्या खासदारांनी एकत्र येत शिंदे गटाला ठणकावलं, "टायगर जिंदा है..."

Shivsena UBT On Operation Tiger : "ठाकरेंची साथ सोडून शंभर टक्के आम्ही कुठेही जाणार नाही, आमची वज्रमूठ आहे, टायगर जिंदा है"; असं म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेचे 9 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.
Shivsena UBT
Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News 07 Feb : "ठाकरेंची साथ सोडून शंभर टक्के आम्ही कुठेही जाणार नाही, आमची वज्रमूठ आहे, टायगर जिंदा है"; असं म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेचे 9 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shivsena UBT) सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

मागील अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते लवकरच उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.

या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले, आज सकाळपासून जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तेच या बातम्या पसरवत आहेत. सरकारमध्ये असून सुद्धा ते स्थिर नाहीत. या सर्व बातम्या येत असताना विषय वळवण्यासाठी या बातम्या सुरू केल्या आहेत.

Shivsena UBT
Shivsena Politics : ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उदय सामंतांचा दुजोरा; म्हणाले, "टप्प्याटप्प्याने..."

तसंच आताही नऊ खासदार उपस्थित आहेत. रोज पुड्या सोडत असतात. पण टप्प्याटप्प्याने त्यांचीच माणसे तिकडे आमदार घेऊन जाणार आहेत, अशा बातम्या येत होत्या. या बातम्यांवरून लक्ष हटवण्यासाठी बातम्या पेरायचं काम सुरू आहे. मात्र, ठाकरेंजवळ निष्ठेने राहिलेल्या लोकांबाबत गैरसमज पसरवला जात आहे, याचा मी निषेध करतो, असं सावंत म्हणाले.

शिवाय आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे असंही सावंतांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, खासदार फोडाफोडीच्या चर्चांवरून थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तिकडे मणीपूर जळत आहे, अमेरिकेतून आपल्या नागरिकांना बेड्या ठोकून देशात आणलं जात आहे.

Shivsena UBT
Shivsena UBT : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांनंतर ठाकरे गट सतर्क, दिल्लीत सर्व खासदारांना एकत्र बोलावलं...

मात्र, हे डुबकी मारत आहेत आणि ती डुबकी पण दिल्लीत निवडणुका आहेत म्हणून मारत आहेत. त्यांचं हिंदुत्व केवळ सत्तेसाठी आहे, त्यांना हिंदुत्वाचं पण काही घेणंदेणं नाही, असं म्हणत सावंत यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com