Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News Sarkarnama
विदर्भ

तुमचे भविष्य ज्योतीशाला विचारुन उपयोग नाही; कारण ते दिल्लीत ठरते : ठाकरेंचा शिंदेंना टोला

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठी मातीतील गद्दारी, असा उल्लेख शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच ही गद्दारी गाडण्यासाठी जिजाऊंच्या जन्मभूमीत सभा घेतल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ते शनिवारी बुलडाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'दसऱ्याचा मेळावा परंपरेनुसार शिवतीर्थावर झाला. तेव्हाच मी ठरवले होते की शिवतीर्थापासून सुरुवात केल्यावर मुंबईच्या बाहेर माझी पहिली सभा होईल ती जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या बुलडाण्यात घेईल. कारण ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे गेले पाहिजे. म्हणून मी आज तुमच्या समोर आलो आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

आज २६ नोव्हेंबर सविधान दिन आहे. मात्र, आज सविधान सुरक्षीत आहे का? असा सवाल ठाकरे यांनी केला. तसेच मी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आलो होतो. त्यावेळी त्यांनी प्रश्न विचारला होता, तोच प्रश्न तुमच्या आणि माझ्या पुढे आहे. पुढचा प्रवास आपल्याला त्याच दिशेने करावा लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खासदार आणि आमदारांसह गुहाटीला गेले आहेत. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, आज ४० रेडे तिकडे गेले आहेत. तीन चार दिवसापूर्वी भविष्य पाहण्यासाठी गेले होते. तुमचे भविष्य ज्योतीशाला विचारुन उपयोग नाही, कारण तुमचे भविष्य हे दिल्लीत ठरते, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांना तिकडे आशीर्वाद घेण्यासाठी जावे लागले मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. मी पुन्हा लढणार आणि जिंकणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार भावना गवळी यांच्यावरही ठाकरे यांनी निशाणा साधला. ''आपल्या पलिकच्या ताई आहेत, ईथेही तुम्ही गद्दारांना आमदार आणि खासदार केले. ताईंच्या चल्या चपाट्यांना अटक केली. ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. त्यामुळे आता 'भैय्या राखीके बंधन को निभाना', आता फोटो छापून आणल्यानंतर ईडी, आणि सीबीआयची हिम्मत आहे त्यांना हात लावण्याची, भाजप आता आयात पक्ष झाला आहे. नेते आणि विचार गेला आहे. हा पक्ष आहे की चोर बाजार, असा टोला त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT