Uddhav Thackeray, Nitin Deshmukh and Others. Sarkarnama
विदर्भ

Akola Shivsena UBT News: अकोल्यात उद्धव ठाकरेंची ताकद वाढली, वंचितचा ‘हा’ नेता लागला गळाला !

मनोज भिवगडे

Akola District Political News : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे, असे शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही नेते आपआपला गट मजबूत करण्याच्या मागे लागले आहे. कुंपणावर असलेले नेते, कार्यकर्तेही आता निर्णय घेऊ लागले आहे. अकोला पूर्व मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले हरिदास भदे यांनी काल शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) प्रवेश केला आहे. (Both the leaders are looking to strengthen their factions)

माजी आमदार हरिदास भदे यांनी काल (ता. ३) मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. भारिप बहुजन महासंघाकडून (आताची वंचित बहुजन आघाडी) अकोला पूर्व मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले हरिदास भदे हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते.

तेथे त्यांचे मन रमले नाही. गेल्या वर्षभरापासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. ते स्वगृही परतणार, अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनी शिवबंधन हातावर बांधून घेण्याचा निर्णय घेतला. गत महिन्यातच त्यांनी शिवसेना (Shivsena) नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती.

त्या बैठकीतील निर्णयानुसार रविवारी माजी आमदार भदे यांना शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख, (Nitin Deshmukh) अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची मातोश्रीवर उपस्थिती होती.

याशिवाय जिल्हा संघटक उमेश जाधव, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, अप्पू तिडके, जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर, संजय आढाऊ, प्रसाद देशमुख, उमेश उबाळे आदींची उपस्थिती होती. माजी आमदार भदे यांच्यासोबत विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या ७१ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला.

त्यात प्रामुख्याने विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अध्यक्ष ॲड. श्रीराम सोनोने, माजी जि. प. सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनकरराव नागे, मराठा ब्रिगेडचे कोषाध्यक्ष योगेश बकाल, मूर्तिजापूर धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष अरविंद गाडवे, प्रसिद्ध प्रमुख प्रा. लक्ष्मण सरोदे.

टाकोनकार समाज संघटनेचे पी.एच. डाबेराव, अनुसूचित जाती सेलचे अकोला शहर अध्यक्ष मिलिंद गवई, कुंभार समाज संघटनेचे दिलीप घाटोळे, भोई समाज संघटनेचे अध्यक्ष भानुदास नंदाणे व त्यांचे सहकारी, बेलदार समजा संघटनेचे हरिश्चंद्र मेंगे व महादेव मेंगे, कोळी समाज संघटनेचे श्रीराम मोरे, ओबीसी संघर्ष समितीचे रमेश पाचपोर, धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुकमाले आदींसह ७१ जणांचा समावेश आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT