Akola News : मराठा समाज आक्रमक ; चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

Maratha Reservation News : जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत.
Chandrashekhar Bawankule News
Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama

Maratha Andolan News : जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या घटनेमुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने अकोला जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अकोला येथे येत असताना त्यांना काळे झेंडे दाखवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे लाठीचार्ज केला. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. विरोधकांनी राज्य सरकावर आरोपांचा भडिमार करत उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जालना जिल्ह्यातील घटनेमुळे समाजाच्या रोषाला भाजप (BJP) नेत्यांना सामोरे जावे लागत आहे.

Chandrashekhar Bawankule News
Nagar ST Service Stopped: मराठा आंदोलन : अखेर पोलीस बंदोबस्तात तीन एसटी बसेस नगरहून पुण्याकडे रवाना...

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे भाजपच्या संवाद यात्रेसाठी अकोला येथे येत असताना शेळद फाटा खामगाव अकोला महामार्गावर त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन करण्यात आहे. सकल मराठा समाज बाळापुरच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

Chandrashekhar Bawankule News
Pawar-Fadnavis Absence In Buldhana : बुलडाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; जालन्यातील लाठीहल्ला ठरले कारण?

दरम्यान, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यांना अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासाठी सकल मराठा समाजाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com