Uddhav Thackeray News Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray News: आज माझ्याकडे पक्ष नाही, पण...; उद्धव ठाकरेंचं पोहरादेवी गडावरून भावनिक आवाहन

Shivsena : उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Political News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे.

या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांची यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच पक्ष फुटीबाबत देखील त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन करत मी तुमच्यासाठी लढत असून अशीच नेहमी साथ नेहमी द्या, असं भावनिक अवाहन केलं.

ठाकरे म्हणाले, "आज माझ्याकडे पक्ष नाही. पण तुमचे प्रेम आहे आणि हे तुमचे प्रेम कायम असंच राहू द्या. मी तुमच्यासाठी लढत आहे. तुम्ही या लढाईमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर राहा", असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीवरून केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपबरोरबर जाऊन भाजप-शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार स्थापन झालं. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेससमध्येही फूट पडली. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादीपक्षावर दावा केला.

आता या सर्व घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्दव ठाकरे हे अॅक्शन मोडवर आले असून या पार्श्वभूमीवरच शरद पवारांनी रणशिंग फुंकले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही आता मैदानात उतरले असून त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली आहे. या दौऱ्याची सुरवात त्यांनी पोहरादेवीच्या दर्शनाने केली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT