Uddhav Thackeray News: मुख्यमंत्रीपदाबाबत शाहांसोबत बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली होती? ठाकरेंचा मोठा खुलासा

Maharashtra Political: उद्धव ठाकरे हे दोन दिवस सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Political News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमध्येही फूट पडली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले असून त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली आहे.

उद्धव ठाकरे यांची आज यवतमाळमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं ठरलं होतं. मात्र, ते वचन अमित शाहांनी पाळलं नाही, असं सांगत मला (उद्धव ठाकरे यांना) भाजपने युतीतून बाहेर ढकललं, असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
Sharad Pawar Resignation : १५ दिवस आधीच सगळं ठरलं होतं..; शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत भूजबळांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"फोडाफोडीचे राजकारणात काही नवीन नाही. आधी पक्ष फोडला जात होता. मात्र, आता पक्ष पळवला जात आहे. पण याबबात लोकं सांगताय की, सध्या जे काही घडतंय ते वाईट आहे. ही परंपरा महाराष्ट्रासाठी वाईट आहे", असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केलं आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : अजितदादांच्या बंडाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया ; "महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही.."

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन मी याआधीच अमित शाह आणि माझ्यात बंद दाराआड काय चर्चा झाली होती हे मी सांगितलं होतं. मी आज पोहरादेवीला आलो आहे. येथे देखील मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, आमच्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची चर्चा झाली होती. मात्र, अमित शाहांनी त्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही. जर त्यांनी वचन पाळलं असतं तर आज भाजप-शिवसेनेचा मुख्यमंत्री असता", असा मोठा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com