Nagpur News, 24 Jan : उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. काल झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक लढण्यात येईल असे सांगून ;एकला चलो रे'चे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे.
याच चर्चांवर आता माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना जसे लढायचे तसे लढू द्या, काँग्रेस आपल्या पद्धतीने लढेल, असं म्हणत त्यांनी आमचाही मार्ग मोकळा असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये आम्हाला आमची ताकद पडताळून पहायची असल्याने महापालिका स्वबळवर लढणार असल्याचे सांगितले होते.
त्यावरून आघाडीत वाद सुरू झाला होता. नागपूरच्या स्थानिक पदाधिकार्यांनी राऊतांच्या (Sanjay Raut) निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्वबळाच्या भाष्यावर आनंद असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आम्ही आघाडी टिकावी म्हणून प्रयत्न करू. त्यांनी भूमिका स्वीकारली असेल तर त्याला काही विरोध नाही. प्रत्येकाचा पक्ष स्वतंत्र आणि विचारधारा वेगळी आहे. आम्ही आमच्या पद्धतीने लढू. सद्यस्थितीत त्यांच्या भूमिकेबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.
यावेळी वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून महायुतीच्या नेत्यांवरही टीका केली. निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यांची मते घेऊन महायुती सत्तेवर आली. आता त्यांना आर्थिक शिस्त आठवायला लागली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मंत्र्यांचे वेगवेगळे वक्तव्य येत आहे. मलिदा खाताना, सत्तेची खुर्ची उपभोगतना एकत्र यायचे आणि मी कुठे असे वक्तव्य केले बोललो असे सांगून हात झटकायची ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे.
आता मंत्री जबाबदारी झटकत आहेत. सरकार म्हणून सामूहिक जबाबदारी आहे त्याचं भान ठेवून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्तता करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी. तर लाऊड स्पिकर असो वा सैफ अली खान असो हिंदू-मुस्लिम असा वाद सुरू करायचा आणि विभाजन करायचे असे या सरकारचे धोरण आहे. संजय निरुपम यांचे वक्तव्य हे बालिशपणाचे आहे. हे प्रगल्भ राजकारण्याचे मत असू शकत नाही. भाजपच्या नेत्यांना काहीही बोलून असुरी आनंद मिळत असेल तर मिळू द्यास असेही वडेट्टीवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.