
Nagpur News : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जशास, तसे प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी, तर आदित्य ठाकरे बालिश आहेत, असे सांगून बावनकुळे यांनी त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "विधानसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते सर्वच गोष्टींना भाजपला जबाबदार ठरवत आहे. जन्मानसाची प्रतिमा मलिन झाल्यावर व जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही खरंतर त्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक होते.
कुठल्याही नेत्याने हेच केले असते. 13 खासदार आणि 50 आमदार त्यांना सोडून निघून गेले, त्यांना जाग येत नाही. त्यांचे नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही. म्हणूनच खासदार, आमदार सोडून गेले. त्यांचा खासदार व आमदारांचे कुठलाही संपर्क नव्हता. त्यांचे लोक सोडून गेले ते मात्र भाजपला दोष देत आहेत. उठसूठ अमित शाह यांच्यावर टीका करतात".
'2019 मध्ये ते भाजप (BJP) सोबत निवडून आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. त्यांनी गद्दारीची सुरुवात केली नसती तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे राहिले असते. शिवसेनासुद्धा त्यांच्याकडे शाबूत राहिली असती. त्यांनी स्वतःच चुका केला. अमित शहा आणि भाजपवर टीका करून त्यांना काही साध्य होणार नाही.
पराभव व लोकं सोडून चालल्याने त्यांना नैराश्य आले आहे. त्यामुळे ते बिनडोकसारखे बोलतात. ते असेच बोलत राहिले आणि भाजवर आरोप करीत राहिले, तर आज त्यांची जी परिस्थिती त्याहीपेक्षा वाईट होईल', असा इशाराही यावेळी बावनकुळे यांनी दिला.
आमचे जनमत अजून वाढणार आहे. आता फक्त विधानसभा जिंकली. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकासमोर आहे. त्यामुळे त्यांचे जनमत आणखी कमी होत जाणार आहे. ज्या घटनेला ते स्वतः जबाबदार आहेत त्यासाठी ते दुसऱ्याला दोष देत आहेत. त्यांच्या बोलणाल्या आता जनता कंटाळली असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
'दावोस'ला आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे. त्या ठिकाणी जगभरातील उद्योगपत्री येत असतात. यात भारतातील उद्योजकांचाही समावेश आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे करार हे दावोसला होत असतात. आदित्य ठाकरे दावोस बाबात जे काही बोलले त्यातून त्यांचा बालीशपणा दिसून येतो. त्यांना अजून सरकार पूर्ण कळले नाही. दोन वर्ष पर्यटनमंत्री होते. मात्र पर्यटनच करीत राहिले. त्यांना कामकाज कसे करावे लागते, प्रशासन कसे चालवावे लागते हे कळले नसल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.