Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray : आमच्याकडे बरेच बॉम्ब, फक्त वाती पेटवण्याचा अवकाश...; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Winter Session 2022: दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधारी नेत्यांनी गंभीर आरोप केलेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे देखील आता मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे गट) अधिक आक्रमक झाली आहे.

या पार्श्वभूमीवरच खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांबाबत मोठे राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचाइशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देत आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत त्यांच्या वाती काढल्या आहेत फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश असल्याचं त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''आमच्याकडे बॉम्ब बरेच आहेत वातीही काढल्या आहेत फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे. पण या आधी महाराष्ट्र- कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी माणसांचे आयुष्य बरबाद होणं थाबविण्यासाठी ठराव केला पाहिजे. कारण त्या भागातील मराठी माणसांनी तेथील निवडणुका जिंकून दाखवल्यात. त्यासाठी त्यांनी आंदोलनं केली लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत'', असं ते म्हणाले.

काही जण म्हणतात आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या. पण या या गोष्टीला आता काही अर्थ नाही. पण याचा अर्थ असाही नाही की त्यांनी गप्प बसावं. जो पर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तो पर्यंत हा भाग केंद्रशासित केला गेला पाहिजे, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra-Karnataka Border) प्रश्न सध्या पेटलेला आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांची आज कर्नाटक सरकारकडून धरपकड करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT