The rulers are unable to control the situation : देशात अराजकता माजली आहे. मणिपूर जळत असताना सरकार हातावर हात देऊन बसले आहेत. तेथील परिस्थिती राज्यकर्त्यांना नियंत्रणात आणता येत नाहीये आणि अशा परिस्थितीत भाजप-आरएसएसचे गुंड समाजात धार्मिक द्वेष, जातीयवाद आणि असत्य पसरवीत आहेत. पण आम्ही भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाविरोधात उभे आहोत, असे ट्विट करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. (BJP and RSS have been targeted)
निवडणुका जवळ येताना पाहून भाजप-आरएसएसचे गुंड समाजाला धार्मिक द्वेष, जातीयवाद आणि असत्य चारत असताना, मी अकोल्यातील एका मुस्लिम व्यक्तीच्या मालकाच्या भोजनालयात दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम अशा वेगवेगळ्या समूहांतील सहकाऱ्यांसोबत `चिकन तंदुरी’, ‘फीश फ्राय’ आणि माझ्या आवडत्या मटण बिर्याणीचा आस्वाद घेतला, असे आंबेडकरांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता देशात भीतीचे वातावरण आहे. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात द्वेषाचे, भीतीचे वातावरण आहे. मणिपूर जळत असताना देशातील सरकार ती परिस्थिती नियंत्रणात आणू शकत नाहीये. पण भाजप पसरवत असलेल्या द्वेषाच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
देशात (India) द्वेष पसरवला जात असताना आपल्या विशेष, वैविध्यपूर्ण ओळखी मजबूत करण्यासाठी, ज्या नेहमीच आपल्या देशाची ताकद राहिल्या आहेत. हा मी आहे. हे आम्ही आहोत. ही वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडी ह्या सर्व द्वेषाच्या आणि भाजप - आरएसएसच्या धार्मिक द्वेषाविरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत, असे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) म्हटले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.