Prakash Ambedkar News : शेतकऱ्यांच्या ‘या’ प्रश्‍नासाठी सरसावले प्रकाश आंबेडकर, दिला आंदोलनाचा इशारा !

Akola : अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Wild animals should be released in Melghat : जनसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरणारी वंचित बहुजन आघाडी आता शेतकऱ्यांसाठी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. वन्यप्राणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात आणि त्याची भरपाईही मिळत नाही. शेतकऱ्यांचा हा प्रश्‍न सोडवण्यासाठी वंचितने कंबर कसली आहे. (The Vanchit Bahujan Aghadi is now the holy grail of agitation for farmers)

शेती पिकांची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांना मेळघाटात सोडण्यात यावे; तसे शक्य नसल्यास तार फेन्सींगसाठी अनुदान द्यावे, असा ठराव ग्राम पंचायतींनी स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या ग्राम सभेत घ्यावा, असे आवाहन वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविण्यात यावा. जर यानंतरही शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे हजारो हेक्टर पेरलेली जमीन व त्यावरील पिकांचे नुकसान होत आहे. स्वत:च्या शेतातील उद्धवस्त झालेले पीक पाहून अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे उत्पादन घटत असून, शेतकरी कर्जबाजारी होत आहे. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे पुढील काही वर्षामध्ये शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत राहतील, अशी शक्यता वाटत आहे, असेही ॲड. आंबेडकर यांचे म्हणणे आहे.

दरम्यान वन्य प्राण्यांकडून पिकांची हानी होत असून, प्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा शाखेने गत आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) सादर केलेल्या निवेदनात दिला होता. याबाबतच्या मागण्या १० दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वंचितकडून देण्यात आला होता.

Prakash Ambedkar
Akola District News : अजित पवारांनी मागवली अकोल्यातील २५ कोटींच्या कामांची यादी!

या आहेत वंचितच्या मागण्या..

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान आताही सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. वन्यप्राण्यांना मेळघाटात सोडण्यात यावे. गावाने वनविभागाला मदत करण्याकरिता कमीत कमी १० सदस्यांचे ग्रामरक्षक दल स्थापन करावे. याबाबतचा ठराव ग्रामपंचायतींनी घेऊन शासनाला पाठवावा व एक प्रत वंचितकडे (Vanchit Bahujan Aghadi) पाठविण्यात यावी.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com