Narendra Modi & Prakash Ambedkar. Sarkarnama
विदर्भ

Vanchit Bahujan Aghadi : ‘त्या’बाबत मात्र मोदी खरे बोलले, आंबेडकर असे का म्हणाले?

Prakash Ambedkar : प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचा मुद्दा

जयेश विनायकराव गावंडे

Vanchit Bahujan Aghadi : नरेंद्र मोदी हे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील हे खरे बोलले होते. मात्र त्यांच्याकडे याची अंमलबजावणी करण्याची ताकद नव्हती, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आंबेडकर हे माळी समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात ‘वंचित’कडून प्रचाराला वेग आला आहे. जिल्ह्यात आयोजित वेगवेगळ्या सभा आणि बैठकांना आंबेडकर स्वतः हजेरी लावत आहेत. अशात त्यांनी माळी समाजाच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

माळी मेळाव्यात बोलताना आंबेडकर म्हणाले, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून जागृती होण्याची आज गरज आहे. आपले नव्वद टक्के दुःख संपलेले असेल असेही आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे बोलले होते की, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील म्हणून हे त्यांचे बोलणे अगदी खरे होते. बाहेर गेलेला पैसा आपल्या देशात आणायचा मग प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील, हे असे शक्य होते. आपण नरेंद्र मोदी हे खरे बोलले मात्र ते खरे बोलून काही फायदा झाला नाही, कारण मोदी यांच्यात याची अंमलबजावणी करण्याची ताकद किंवा हिंमत नव्हती, असा टोलाही आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंबेडकर म्हणाले, आज सत्तेत असलेली घराणेशाही संपवायची आहे. एकाच समाजाचे असलेले राजकारण मोडून काढायचे आहे. त्या काळात तर महात्मा गांधी यांनी सामान्य माणसाचे प्रश्न उचलून सामान्य माणसाच्या हातात झेंडा दिला आणि रस्त्यावर फिरायला लावले आणि व्यवस्थेला ‘चॅलेंज’ दिले. त्यांनी एक मानसिकता बनवली होती, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. कीर्तनकार यांना महिन्याला पाच हजार रुपये मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सरकारला जास्तीत जास्त महिन्याला शंभर कोटी खर्च येईल. शंभर कोटी तर एखादा मंत्रीच खातो. यांना आज असे वाटते की हे शंभर कोटी आपल्या खिशातून घेतील, असेही आंबेडकर म्हणाले.

सामान्यांच्या खात्यात जमा होणारे पैसे सरकारला तिजोरीतून द्यायचे आहेत. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात आम्ही सहभागी होती. मखराम पवार, दशरथ भांडे, रामदास बोडखे हे मंत्रिमंडळात सहभागी होते. त्यावेळी आमचे जर आणखी काही दिवस व्यवस्थित चालले असते तर ‘स्कॉलरशिप’ प्रमाणे कीर्तनकारांचा प्रश्न निकाली काढला असता असा दावाही आंबेडकर यांनी बोलताना केला.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT