Vardha Lok Sabha election 2024 Sarkarnama
विदर्भ

Pooja Tadas News: मोदीजी, मला न्याय द्या; भाजप खासदाराच्या सुनेची विनंती; पूजा तडस यांचे कुटुंबियांवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News: वर्धा लोकसभा मतदारसंघात (Vardha Lok Sabha election 2024) भाजपकडून रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांच्या विरोधात त्यांची सुन पूजा तडस (pooja tadas) या अपक्ष म्हणून रिंगणात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मोदींनी मला न्याय द्यावा," अशी विंनती पूजा तडस यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) उपस्थित होत्या.

पूजा तडस यांनी यावेळी रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मोदींजी 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहे. मी पंतप्रधान मोदींना एक विनंती करते की, माझ्या मुलाला न्याय द्या. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्या आणि त्यांना मला न्याय द्यावा," असे पूजा तडस म्हणाल्या.

"मला मुल झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की, हे बाळ कोणाचं? या बाळाची डीएनए चाचणी करा, असं बोलण्यात आलं. मला रॉडनंही मारण्यात आलं," असा गंभीर आरोप पूजा यांनी केला आहे.

पूजा तडस यांनी केलेले आरोप रामदास तडस यांनी फेटाळले आहेत. "निवडणुका आल्या की आरोप होत असतात. माझ्या मुलाची आणि त्या मुलीची न्यायालयात केस सुरू आहे. त्या दोघांनी लग्न केलं हे मला माहीत नाही. त्यानंतर वाद झालेत, ते दोघेही एकमेकांविरोधात न्यायालयात गेले आणि वेगळे झाले. आम्ही आमच्या घरी होतो. माझा त्या मुलीशी काहीही संबंध नाही. आता निवडणूका आल्यामुळे आरोप होत आहेत," असे रामदास तडस यांनी सांगितले.

"पूजा तडस हिने गंभीर आरोप केले असले तरी ती आमच्यासोबत राहत नाही. ती तिच्या नवऱ्यासोबत राहते. त्यांच्यात वाद झाल्यावर दोघेही न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे माझा या प्रकरणी काही देणे-घेणे नाही. पुढे काय करायच ते त्यांनी त्याचं पाहावं," असे तडस यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT