Akola & Telhara Panchayat Samiti Results
Akola & Telhara Panchayat Samiti Results Sarkarnama
विदर्भ

अकोल्यातील दोन पंचायत समित्यांवर 'वंचित'चा गड कायम

सरकारनामा ब्यूरो

अकोला : अकोल्यातील (Akola) पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीनंतर सभापतीपद (Panchayat Samiti Chairman) रिक्त झालेल्या अकोल्यातील तेल्हारा आणि अकोला पंचायत समितीवर अपेक्षेप्रमाने वंचित बहुजन आघाडीने आपली सत्ता कायम राखत आपला 'गड' राखला आहे.

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्याने जिल्ह्यातील सातही पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या ओबीसींच्या जागांची पोटनिवडणुक पार पडली. दरम्यान, अकोला आणि तेल्हारा पंचायत समितीची सभापती पद रिक्त झाल्याने या ठिकाणी सभापती पदासाठी आज (ता.22 नोव्हेंबर) निवडणूक पार पडली. यामध्ये अकोला पंचायत समिती सभापती पदाकरीता राजेश वावकार तर, तेल्हारा पंचायत समिती सभापती पदाकरीता उज्वला हेमराज काळपांडे ह्या बिनविरोध निवडुन आले आहेत. त्यामुळे अकोल्यातील दोनही पंचायत समितीचा गड 'वंचित'ने राखला आहे. विशेष म्हणजे तेल्हारा पंचायत समिती मध्ये वंचितकडे सभापती पदासाठी उमेदवार नसल्याने काँग्रेसच्या काळपांडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत. वंचितमध्ये प्रवेश करत सभापती पद मिळविले आहे.

या निवडणुकीत वंचित बाजी मारेल असा अनेक राजकीय जाणकारांनी अंदाज बांधला होता. त्यानुसार आज 'वंचित'ने सत्ता कायम राखली आहे. जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या उपसभापतींची निवडणूक आटोपल्यानंतर अकोला व तेल्हारा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरु होती. दोन्ही सभापती पदासाठी वंचित बहुजन आघाडीचे पारडे जड असल्याचे दिसून येत होते. 20 सदस्य संख्या असलेल्या अकोला पंचायत समितीमध्ये वंचितचे 11 तर तेल्हारा पंचायत समितीमधील 16 पैकी 9 सदस्य वंचितचे आहेत. तर कॉंग्रेसच्या पंचायत समिती सदस्य उज्ज्वला काळपांडे यांनी गुरुवारीच (ता.१८ नोव्हेंबर) वंचितमध्ये प्रवेश केल्याने वंचितची सदस्य संख्या दहा झाली होती. त्यामुळे दोन्ही पंचायत समितीवर वंचितचा झेंडा फडकणार हे स्पष्टच होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT