Vidarbha Farmer Crisis Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Farmer Crisis : विदर्भात 24 तासांत पाच शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल; कर्जमुक्ती योजनेदरम्यानच्या घटनांमुळे सरकारची चिंता वाढली

Five farmer suicides reported in Vidarbha within 24 hours amid debt and crop distress : अमरावती, वाशीम आणि यवतमाळमध्ये घटना; कर्जबाजारीपणा, नापिकी, पावसाचा खंड अन् कर्जफेडीच्या चिंतेतून शेवट केल्याची माहिती समोर आली आहे.

Pradeep Pendhare

Farmer Debt Maharashtra : राज्यातील महायुती सरकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू असतानाच, विदर्भातून राज्याला हादरवणारी घटना समोर आल्या आहेत.

विदर्भात गेल्या 24 तासांत पाच शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यापैकी दोघांनी विषारी औषध प्राशन केले, तर तिघांनी गळफास घेऊन जीवन संपविले. या घटना अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत घडल्या.

नामदेव रामचंद्र तायडे (वय 70, रा. दर्याबाद), गजानन विनायक काळमेघ (वय 70, रा. धामणगाव रेल्वे), दिनेश नारायण राऊत (वय 45, रा. खेडपिंपरी, ता. नांदगावखंडेश्वर), आनंदराव राजाराम खाडे (वय 85, रा. कामरगाव), विष्णू सदानंद मेटकर (वय 23, रा. नगरवाडी, ता.महागाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची (Farmer) नावे आहेत.

नामदेव तायडे यांनी पीककर्ज घेतले होते. परंतु, काही दिवसांपासून पाऊस नसल्याने तायडे तणावात राहत होते. तसेच पत्नीच्या नावावरही शेतीसाठी कर्ज (Crop Loan) घेतले. मात्र उत्पन्नाची आशा मावळल्याने तायडे यांनी घरातच कीटकनाशक औषध प्राशन केले.

दुसऱ्या घटनेत गजानन काळमेघ यांनीही नापिकी व कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध घेत आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत सातेफळ फाटा ढाब्यासमोर दिनेश राऊत यांनीही कर्जबाजारीपणातून गळफास घेऊन आत्महत्या केली.

चौथ्या घटनेत आनंदराव खाडे यांनी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याची खंत आणि पावसाच्या खंडामुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था, कर्ज फेडण्याची चिंता यामुळे अस्वस्थ होत गळफास लावून जीवन संपविले.

पाचव्या घटनेत विष्णू मेटकर या युवा शेतकऱ्याने घटलेले कापसाचे उत्पादन, अत्यल्प पाऊस आणि कर्जबाजारीपणामुळे शनिवारी गळफास लावून आत्महत्या केली. राज्यातील महायुती सरकारने कर्जमुक्तीची योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमुक्ती योजनेची रक्कम जमा होत आहे. असे असताना, महायुती सरकारची शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे चिंता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT