PM Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Narendra Modi News: विदर्भातील नेत्यांना मोदींनी विचारला जाब; नागपूरमध्ये मतदान कमी का?

Nagpur Lok Sabha Constituency 2024: "मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता.हजारो मतदारांची नावे गहाळ झालीअनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या.संथ गतीने मतदान होत असल्याने अनेकजण मतदान न करताच निघून गेले,,असे उत्तर पदाधिकाऱ्यांनी दिले.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News: नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात (Nagpur Lok Sabha 2024) ७५ टक्के मतदान होऊ शकले नाही. रामटेकच्या तुलनेत नागपुरमध्ये कमी मतदान झाले, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील नेत्यांना जाब विचारला आहे.

प्रशासनाचा निरुत्साह, वाढते तापमान आदी कारणे सांगून या नेत्यांनी मोदींच्या प्रश्नांतून आपली सुटका करुन घेतली. पंतप्रधान मोदींना जेव्हा पदाधिकाऱ्यांना भेटले तेव्हा त्यांनी नागपूरमध्ये मतदानाचा टक्का कमी का, असा प्रश्न विचारला. तापमान ४१ अंश सेल्सिअस होते. प्रचंड ऊन व उकाड्यामुळे बरेच मतदार घराबाहेर पडले नाहीत, असे पदाधिकाऱ्यांनी मोदींना सांगितले.

"मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता.हजारो मतदारांची नावे गहाळ झालीअनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या.संथ गतीने मतदान होत असल्याने अनेकजण मतदान न करताच निघून गेले,,असे उत्तर पदाधिकाऱ्यांनी दिले. भेट घेणाऱ्यांमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी महापौर संदीप जोशी, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा समावेश होता.

नागपूरमध्ये शुक्रवारी पंतप्रधान मोदी रात्री मुक्कामाला होते. वर्धा लोकसभा मतदासंघात प्रचार सभा घेण्यासाठी ते जबलपूर येथून विदर्भात आले होते. रात्रभर राजभवनवर त्यांनी मुक्काम केला. काल (ता.२०) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते नांदेडकडे रवाना झाले.पदाधिकाऱ्यांनी नागपूर विमानतळावर मोदींची भेट घेतली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा लढत आहे.त्या ठिकाणी फक्त ५४ टक्के मतदान झाले. भाजप आणि प्रशासनाने ७५ मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. पण नेहमी प्रमाणेच सरासरी मतदान झाले. मतदान जागृतीसाठी प्रशासनाने मोहीम राबवली होती. पण त्यांचा फारसा फायदा झाला नाही. मतदानात वाढ झाली नाही. मतदान केल्यानंतर सकाळी नितीन गडकरी यांनी ७५ टक्के मतदान होईल, असे सांगत आपण पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT