Patil Vs Bhujbal: लोकसभा निवडणुकीच्या दुसरे टप्प्यातील कामकाज सुरू झाले आहे. मात्र अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये काही मतदार संघाच्या जागा वाटपावरून मोठा गोंधळ आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) नाशिकच्या दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जिल्ह्यातील राजकीय माहिती घेतली. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून असलेल्या वादावर बोट ठेवले.
नाशिक लोकसभा मतदार संघ (Nashik lokSabha election 2024) कोणाला सोडायचा यावरून महायुतीमध्ये वाद आहेत. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या जागेवर दावा सांगितला आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने वरिष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. भुजबळ यांनी उमेदवारीसाठी तयारी देखील केली होती. मात्र विसंवादामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी दोन दिवसापूर्वी त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सर्व विरोधाभासामध्ये तिन्ही पक्ष आपलाच अजेंडा रेटण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे महायुतीत समन्वयाचा मोठा अभाव आहे. फक्त आपल्यालाच मतदारसंघ मिळाला पाहिजे. सहकारी पक्षाचा उमेदवार पराभूत होईल, अशी स्थिती ते जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. त्यामुळे काही मतदार संघाच्या जागा वाटपावरून महायुतीत धुसफुस सुरु आहे.
महायुतीतील या वादावर जयंत पाटलांनी टीका केली. ते म्हणाले, "महायुतीमध्ये घटक पक्षांच्या नेत्यांत परस्परांवर विश्वास राहिलेला नाही. अन्य पक्षाचा उमेदवार असल्यास तो पराभूत होईल, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. यातून महायुती लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना किती धास्तावलेली आहे, हे स्पष्ट होते,"
पाटील म्हणाले, "छगन भुजबळ आमच्या पक्षात होते तेव्हा आम्ही त्यांना आमचे नेते मानत होतो. आज त्यांची काय अवस्था झाली आहे हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात त्यांचे स्थान काय याबद्दल देखील मला सांगता येणार नाही. महायुतीमध्ये सध्या असलेली स्थिती जनतेला देखील माहित आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची योग्य जागा दाखवील. त्यात कुठेही कमतरता राहणार नाही,"
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.