Vijay Wadettiwar News : Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar News : पंतप्रधानांच्या टीकेला वडेट्टीवारांचे जोरदार प्रत्युत्तर ; अडवाणी कुणामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाही ?

Congress News : मंगळवारी देशातील इतर राज्यातील सात विधानसभेच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : काँग्रेसमुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान होता आले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान मोदींच्या आरोपांना काँग्रेस (Congress) नेते व विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्त्युत्तर दिले. ' भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कुणाच्या अहंकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाही? असा सवाल त्यांनी केला.

वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) नागपुरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. पंतप्रधानांच्या वक्तव्यावर भाष्य करताना वडेट्टीवर म्हणाले, 'पंतप्रधानांच्या वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. लालकृष्ण अडवाणी कोणाच्या अहंकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत, कोणाचा अहंकार या देशाला अधोगतीकडे नेतो आहे. हे या देशातील सव्वाशे कोटी जनता पाहत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मंगळवारी देशातील इतर राज्यातील सात विधानसभेच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. मात्र, पुणे आणि चंद्रपूर लोकसभेची निवडणूक जाहीर केलेली नाही, या विषयी वडेट्टीवार यांना विचारले असता, चंद्रपूर आणि पुणे निवडणुकीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या नऊ महिन्यांचा कालावधी आहे. लोकसभेची निवडणूक घ्यायची म्हटले तर ४५ दिवस आचारसंहितेत जातील. निकालाला पुन्हा दहा दिवस लागतील. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाशी मी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, बच्चू कडू यांना आता कोण ऐकते ते कळून चुकले आहे. म्हणून पुढच्या दिवसात ते त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे, हे ठरवून योग्य निर्णय घेतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम गुरुवारी ठेवला आहे. त्या कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार जाणार आहेत का? या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले, आमच्या आमदारांचा जाण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडीचे आमदार या कार्यक्रमाला जाणार नाहीत. कदाचित हा निरोप समारंभ असू शकतो. असे मला दिसत आहे, आमच्या लोकांनी त्यांना निरोप देण्याचा विषयच नाही.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT