Congress MP Pratibha Dhanorkar Vijay Wadettiwar sarkarnama
विदर्भ

Wadettiwar Vs Dhanorkar : चंद्रपूरचा महापौर अन् गटनेता कोण? खासदार धानोरकरांनी 'पॉवर' दाखवताच वडेट्टीवारांनीही घेतलं जुळवून, सोडला तोरा

Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar : आक्रमक नेते विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोकरांच्या निर्णयास संमती द्यावी लागली. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण चर्चेत.

Rajesh Charpe

Nagpur News : विजय वडेट्टीवार यांची आक्रमक नेता अशी ओळख आहे. मुख्यमंत्रीच काय कोणावरही सडेतोड आरोप करतात. मागेपुढे बघत नाही. मात्र चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोकर यांनी त्यांची चांगलीच कोंडी केली. चंद्रपूरचा महापौर आणि गटनेता ठरवण्याचा खासदारांच्या निर्णयाला त्यांना संमती द्यावी लागली. एवढेच नव्हे तर कोणी शिवी दिली ती ऐकून घेण्याची तयारी दर्शवून त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

चंद्रपूरमध्ये महापौर कोणाचा यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. या वादावर प्रदेशाध्यक्षांनी तोडगा काढला आहे. मात्र आता धानोरकर यांना बहुमतासाठी लागणार आकडा गाठून देण्याची अवघड जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने तिकीट कापलेले दोन बंडखोर निवडून आले आहे. ते वडेट्टीवार यांच्यासोबत आहेत. महापौर कमहापौरांचा उमेदवार बघून त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

चंद्रपूर महापालिकेबाबत सुरुवातीला आक्रमक असलेले वडेट्टीवार यांनाही नमते घ्यावे लागल्याने ते नाराज आहेत. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहे. यापैकी काही नगरसेवकांना वडेट्टीवार नागपूरमध्ये घेऊन आले होते. यावरून खासदार धानोरकर आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. धानोरकरांनी वडेट्टीवारांना काँग्रेसच्या नगरसेवकांना उचलून आणण्याची गरज काय असा सवाल केला होता. ते गरजेपेक्षा जास्त चंद्रपूर शहरात लुडबूड करतात.

ते काँग्रेसचे नेते आहेत. राज्यभर त्यांनी फिरावे असा सल्लाही त्यांनी दिला होता. त्यावर वडेट्टीवारांना काही नेते स्वतःला पक्षाचे मालक समजायला लागले असल्याची टीका धानोरकर यांच्यावर केली होती. धानोरकर यांनी 14 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन केल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडवून दिली. शेवटी प्रदेशाध्यक्षांना त्यांचा हट्ट पूर्ण करावा लागला.

महापौरपद त्यांच्या गटाला देण्यात आले. त्यावरून वडेट्टीवार प्रचंड नाराज झाले आहेत. मात्र मी नेता असल्याने प्रदेशाध्यक्षांचा आदेश पाळणार असल्याचे सांगून आपल्याला पदापेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सध्याचे राजकारण बेइमानीची झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणाला काही म्हणता येत नाही. कोणी शिवी दिली तरी ती ऐकून नेत्याला पुढे जावे लागते. कोणी अरे म्हटले तरी कारे म्हणता येत नाही अशा शब्दात आपली हतबलता व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT