Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar sarkarnama
विदर्भ

Wadettiwar, Dhanorkar Politics : चंद्रपूरमध्ये नवा राजकीय ट्विस्ट! वडेट्टीवार, धानोरकर यांनी मतभेद ठेवले बाजूला, एकत्र येत दिले संकेत...

Chandrapur District Central Co-Operative Bank Politics : खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत बँकेत काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Rajesh Charpe

Chandrapur News : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांना आव्हान देणारे काँग्रेसचे दोन दिग्गज नेते चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मात्र एकत्र आले आहेत. हम सब एक है असा संदेश त्यांनी दिला असला तरी आषाढीच्या दिवशी नेत्यांची निघालेली ही ‘वारी‘ सत्तेच्या खुर्चीची असल्याची चर्चा यामुळे जिल्ह्यात रंगली आहे. (Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar, former political rivals in Chandrapur reunite for the Chandrapur Cooperative Bank elections)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता. त्यांना देवयानी वडेट्टीवार यांना येथून उमेदवारी द्यायची होती. ही जागा दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची होती. त्यामुळे प्रतिभा धारोकर यांनी यावर आपला हक्क सांगितला. यावरून त्यावेळी चांगलीच खडाजंगी झाली होती.

सोशल मिडियावरून एकमेकांच्या विरोधात आपसात वॉर छेडले होते. प्रतिभा धानोरकर जिंकल्यानंतर त्यांनी आपले लक्ष वडेट्टीवारांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाकडे वळवले होते. त्यावेळी त्यांनी समाजाच्या मेळाव्यात एक अल्पसंख्यांक आपल्यावर राज्य करत असल्याचे म्हटल्याने मोठी खळबळ उडाली होती. हा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहचला होता. आता झाले गेले विसरून दोन्ही नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे दिसून येते.

आधी खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्या नागपूरच्या घरी भेट दिली. वडेट्टीवारांनी चंद्रपुरात त्यांच्या बंगल्यावर येऊन एकीकरणाची टाळी दिली. सहकारी बँकेच्या निवडणुकीने काँग्रेसच्या नेत्यांना एकमेकांचे सहकारी केले अशी मिश्कील कुजबुज कार्यकर्त्यांत यावरू सुरू झाली आहे. एवढेत नव्हे तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीने सगळ्यांना एका व्यासपीठावर आणले. सुरुवातीला खासदार धानोरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे आणि आमदार बंटी भांगडिया यांनी हातमिळवणी केली. तब्बल 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले.

आमदार भांगडिया बँकेचे "मार्गदर्शक" होण्याच्या तयारीत दिसले. वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शकपदाची खुर्ची डळमळली. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आमदार भांगडिया यांची घोडदौड थांबवण्यासाठी "बुडत्याला काठीचा आधार" म्हणत सगळे नेते मतभेद विसरून एकत्र आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, संचालक रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार यांच्यासह इतर नेत्यांची खासदार धानोरकर यांनी खासदार धानोरकरांच्या बंगल्यात बैठक झाली. सध्या काँग्रेसचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर भाजपचे चार. निवडणूक अटीतटीची असल्याचे बघून आणि चंद्रपूरवरील वर्चस्वासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचे सर्वांना पटले असल्याचे दिसून येते.

खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत बँकेत काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेचे विद्यमान संचालक शेखर धोटे यांची उमेदवारी मागे घेण्याचे आणि विजय बावणे यांना बिनविरोध निवडून आणण्याचे ठरले. चंद्रपूर तालुका 'अ' गटातून बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे, ओबीसी गटातून काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे यांनाही निवडून आणण्याची रणनीती आखण्यात आली.

'ब' वर्ग गट 2 मधून रोहित बोम्मावार, उमाकांत धांडे, किशोर ढुमणे यांच्यापैकी काहींनी ढुमणे यांना, तर काहींनी बोम्मावार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अनुसूचित जाती गटातून उभे असलेले ललित मोटघरे यांना पाठिंबा देण्याचे ठरले. वरोरा ('अ' गट): जयंत टेमुर्डे, विजय देवतळे, वसंत विधाते यांच्यात लढत होईल. भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्गात पांडुरंग जाधव, दामोदर रूयारकर, यशवंत दिघोरे यांच्यात सामना रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT