Vijay Wadettiwar and Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : आघाडीबाबत काही खरं नाही, विजय वडेट्टीवार म्हणाले राष्ट्रवादीची भूमिका अस्पष्ट

Vijay Wadettiwar questions MVA alliance clarity, says NCP’s role remains uncertain in Maharashtra politics : शरद पवार जे बोलतात त्याचे दोन तीन अर्थ निघतात. त्यांना नेमके काय सांगायचे व सुचवायचे आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तो पर्यंत काहीच बोलता येत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Rajesh Charpe

Vijay Wadettiwar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती तसेच आघाडीत बिघाडी होण्याचीच अधिक शक्यता वर्तविली जात आहे. कुठल्याच पक्षाचे नेते याबाबत खात्री देत नाहीत. या उलट स्थानिक नेते निर्णय घेतील असे सांगून मोकळे होत आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा स्थानिक नेतेच याबाबत निर्णय घेतील असे सांगून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत काही स्पष्टता नसल्याचे सांगितले. शरद पवार जे बोलतात त्याचे दोन तीन अर्थ निघतात. त्यांना नेमके काय सांगायचे व सुचवायचे आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तो पर्यंत काहीच बोलता येत नसल्याचेही ते म्हणाले. एकूणच वडेट्टीवार यांनी प्रत्येकाने आपली तयारी करावी आणि आपआपल्या सोयीनुसार निर्णय घ्यावा हे सांगून टाकले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वीच महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचे सर्वाधिकारी स्थानिक नेत्यांना दिले असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. हे बघता नागपूर महापालिका आणि नागपूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमी आहे.

नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा आधीपासूनच आघाडीला विरोध आहे. ग्रामीणमध्ये माजी मंत्री सुनील केदार हेच सर्व निर्णय घेत असतात. ते कोणाचेच ऐकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार आघाडीबाबत जे काही बोलले त्याचे वेगवगेळे अर्थ काढल्या जात आहे. विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा जोपर्यंत त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट होत नाही तोपर्यंत आघाडीबाबत काहीच सांगता येत नाही असे सांगितले.

राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत यावर बोलणे उचित नाही. आघाडीचे सोड तिकडे महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेसुद्धा महायुतीत करतील की नाही याबाबतही काही सांगता येत नाही. खासदार सुप्रिया सुळे वादळवारा, पाऊस, छत्रीची उपमा देऊन ज्या काही बोलल्या त्याचा अर्थ कळायला मार्ग नाही. याचा अर्थ काय होतो हे त्याच सांगू शकतात. रेनकोट, छत्रींचा काय करायचे हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भूमिकेवर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. ज्यांना आघाडी करायची आहे, आघाडीत राहायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. याचा सर्वस्वी निर्णय स्थानिक नेत्यांच्या बैठका आणि निर्णयावर अवलंबून असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT