Eknath Shinde : नाशिक मनपासाठी एकनाथ शिंदेंचा बिग प्लॅन, सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले आपल्या जिवलग मित्राला...

Eknath Shinde's Strategic Move for Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेची निवडणूक शिवसेना महायुती म्हणूनच लढवणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. उदय सामंत हे शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानात बोलत होते.
Eknath Shinde,nashik nmc
Eknath Shinde, nashik nmcSarkarnama
Published on
Updated on

Nashik Municipal Corporatio : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने सर्वच इच्छुक पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मात्र या निवडणुका युती म्हणून लढवणार की स्वतंत्रपणे स्वबळावर लढविण्यासाठी चाचपणी केली जाणार यावर घमासान सुरु असतानाच महत्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना(शिंदे गटाने) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक शिवसेना महायुती म्हणूनच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उदय सामंत हे शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानात बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका जिवलग सहकाऱ्याच्या खांद्यावर नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपवली आहे, त्यासंदर्भातही सामंत यांनी माहिती दिली.

मंत्री सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन मी कार्यकर्त्यांपर्यंत आलो आहे. नाशिक महापालिका निवडणुक ही आपल्याला महायुती म्हणून लढायची आहे असा आदेश शिंदे साहेबांचा आहे. तसेच निवडणुकी संदर्भातील सर्व निर्णय मंत्री दादा भुसे हे घेतील. त्यामुळे इतर कोणीही कोणतीही प्रतिक्रिया त्यासंदर्भात देऊ नये. महापालिका निवडणुकीच्या संदर्भात जे काही बोलायचे असेल किंवा निर्णय घ्यायचे असेल ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दादा भुसे घेतील. असा निरोप एकनाथ शिंदें साहेबांचा आहे. त्यामुळे त्या आदेशाचे सर्वांनी पालन करा अशा सूचना सामंत यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Eknath Shinde,nashik nmc
Uday Samant : मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ नाकारले, काय आहे कारण?

दरम्यान सामंत यांनी पुढे बोलताना म्हटंल की, नाशिक महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार व महायुतीचाच महापौर होणार. "तुमच्या केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, घरोघरी जाऊन संवाद साधा. इतर कोणी कितीही मोठमोठ्या घोषणा केल्या तरी त्यावर उत्तर देण्याची गरज नाही," असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी महायुतीकडून कंबर कसली गेली असून, सामंत यांनी पुढील रणनीतीसाठी कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या आहेत.

Eknath Shinde,nashik nmc
Nashik Municipal Election : सोयीच्या प्रभागरचनेसाठी नेत्यांची आताच फिल्डिंग सुरू !

दरम्यान नाशिक महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती सत्ता आणण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. भाजकडून नाशिकमध्ये १०० प्लस चा नारा देण्यात आला आहे. १०० हुन अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपमध्ये अन्य पक्षातील नेत्यांचे इन्कमिंग सुरु केले आहे. निवडून येणारे चेहरे भाजपकडून हेरले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com