Vijay Wadettiwar-Sandeep Joshi Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar Vs Joshi :मुलीच्या बारचा उल्लेख करणाऱ्या जोशींना वडेट्टीवारांचा इशारा; म्हणाले ‘त्या’ हॉटेलमध्ये काय घडलं होतं?, याची माझ्याकडे माहिती’

Vidarbh Politics : काँग्रेसने नेहमीच इतिहासाची दिशाभूल केली आहे. हेच त्यांचे धोरण आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आणि गुढी उभारण्याचा संबंध नाही. महाभारत काळापासून गुढी उभारण्याची परंपरा आहे. ती कशी सुरू झाली, याची माहितीही आमदार जोशी यांनी या वेळी दिली होती.

Rajesh Charpe

Nagpur, 01 April : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संदीप जोशी यांच्यात आता एकमेकांच्या संस्कृतीवरून शाब्दीक खडाजंगीला सुरुवात झाली आहे. मुलीसाठी बार उघडून देणाऱ्या वडेट्टीवारांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा नसल्याची टीका संदीप जोशी यांनी केली होती. त्यास आज वडेट्टीवारांनी कुटुंबातील मुलीवर टीका करणे आणि सणांच्या दिवशी मांसाहार करणे हे तुमच्या कुठल्या सनातन संस्कृतीमध्ये बसते, असा सवाल जोशी यांना केला आहे. यावरून आता या दोन्ही नेत्यांमधील सवाल-जवाब वैयक्तिक स्तरावर गेल्याचे दिसून येते.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खून गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी झाला होता, त्यामुळे कशाला गुढी उभारायची? मी नाही उभारत गुढी-बिढी असे वक्तव्य केले होते. त्यास उत्तर देताना आमदार संदीप जोशी यांनी मुलीच्या अर्थार्जनासाठी बार उघडून देणाऱ्या वडेट्टीवार यांच्याकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा करता येत नाही, अशी टीका केली होती.

काँग्रेसने नेहमीच इतिहासाची दिशाभूल केली आहे. हेच त्यांचे धोरण आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आणि गुढी उभारण्याचा संबंध नाही. महाभारत काळापासून गुढी उभारण्याची परंपरा आहे. ती कशी सुरू झाली, याची माहितीही आमदार संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी या वेळी दिली होती. गुढीला छत्रपतींच्या खुनाशी जोडून वडेट्टीवार आणि काँग्रेस लोकांची दिशाभूल करीत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याची टीकाही यावेळी जोशी यांनी केली होती.

राजकीय वादविवादात मुलीचा उल्लेख केल्याने वडेट्टीवार चांगलेच संतापले आहेत. त्यांनीसुद्धा संदीप जोशी यांच्या सनातनी संस्कृतीवर टीका केली. जो माणूस सणाच्या दिवशी मांसाहार करतो, त्यांनी आम्हाला संस्कृती शिकवू नये, असा जोरदार प्रहार केला. जोशी यांचे काय धंदे आहेत, हे आम्हाला ठावूक आहेत.

एका हॉटेलमधील यापूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख करून वडेट्टीवार यांनी त्यावेळी काय घडले होते, याची आम्हाला संपूर्ण माहिती असल्याचे सांगून एक प्रकारे हे संपूर्ण प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दिला आहे. आता त्यांना जोशी काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT