Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Wadettivar Took Notice : ठाणेदाराने शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीची विरोधी पक्षनेत्यांनी घेतली दखल, म्हणाले…

Channi District Akola : शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात चान्नी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा येथील सुभाष इंगळे या शेतकऱ्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून ठाणेदाराने मारहाण केल्याची तक्रार पीडित शेतकऱ्याच्या पत्नीने गृहमंत्र्यांकडे केली आहे. शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची दखल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. (Vadettiwar has taken the initiative to take action)

शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबत चान्नी पोलिस स्टेशनच्या ठाणेदारासह संबंधितांवर कारवाई करण्यासाठी वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणेदार विपुल पाटील यांनी शेतकऱ्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून पैशाची मागणी केली व तुझ्या विरुद्ध तक्रार असल्याचे सांगितले. शेतकऱ्याला अर्धनग्न करून मारहाण केली व खोटे गुन्हे दाखल केल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

पिंपळखुटा येथील मंगला सुभाष इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रशांत शेषराव वानखडे व मिलींद शेषराव वानखडे, भाऊराव बळीराम वानखडे यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली व विनयभंग केला. याबाबत ठाणेदार विपुल पाटील यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांनी स्वीकारली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय त्यांचे पती सुभाष इंगळे यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून ठाणेदाराने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. शेतीच्या वादातून सुभाष बळीराम इंगळे यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जखमी सुभाष यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही तक्रार गृहमंत्र्यांसोबतच पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षकांनाही देण्यात आली आहे.

शेतीच्या वादातून तक्रार..

सुभाष इंगळे यांचे पिंपळखुटा येते शेत आहे. त्यांचे शेत दिव्यांग शेतकरी प्रशांत शेषराव वानखडे (३३) यांचा शेताला लागून आहे. याच शेतीवरून वाद झाला व जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची तक्रार वानखडे यांनी चान्नी पोलिस स्टेशनला २५ ऑगस्ट रोजी दिली होती. त्यावरून पोलिसांनी सुभाष इंगळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, २९४ नुसार गुन्हा दाखल केला.

त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक १९९८ कलम ३ (२)(व्हीए) व दिव्यांग व्यक्ती अधिकारी अधिनियम २०१६ चे कलम ९२(बी), ९२ (एफ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित शेतकऱ्यावर (Farmer) २५ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाले तेव्हापासून आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. माझ्यावर कोणी काहीही आरोप घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. मी कायद्याची बाजू घेऊनच काम करत आहे, असे चान्नी पोलिस (Police) स्टेशनचे ठाणेदार विपुल पाटील यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT