Vijay Wadettiwar and Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar on Modi : महिला आरक्षण म्हणजे, मोदी सरकारने दिलेले आणखी एक ‘चॉकलेट’

Modi Government : महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष कसे भरकटवायचे, हे भाजपकडून शिकायला पाहिजे.

Atul Mehere

Nagpur Political News : केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या नावाखाली आणखी एक चॉकलेट लोकांना दिले आहे. आरक्षण केव्हा लागू होईल, होईल की नाही होणार, याबद्दल अनिश्चितता आहे. देशभरातील मोदीभक्त मात्र या विधेयकाचे स्वागत करण्यात गुंग आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष कसे भरकटवायचे, हे भाजपकडून शिकायला पाहिजे, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Should learn from BJP that how to divert people's attention from important issues)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा)

आज (ता. २०) सकाळी वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, ओबीसी महिलांसाठीही आरक्षणाची तरतूद झाली पाहिजे. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शासनाने गेले पाहिजे. महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. काही भागांमध्ये अवर्षणाची परिस्थिती आहे. या दोन्हींमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

शासनाने व नेत्यांनी केवळ वातानुकूलित कक्षांमध्ये न बसता थेट शेतीच्या बांधापर्यंत जाऊन नुकसानाचे पंचनामे सुरू करावेत. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने वडेट्टीवार यांनी विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा दौरा केला. चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा आदी अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातही शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सरकारी यंत्रणा अद्यापही ढिम्म बसली आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केवळ सर्वेक्षण करून काहीच होणार नाही. नुकसानग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्याची गरज असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत दिली जाणेही तितकेच गरजेचे आहे.

एकूणच परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे दु:ख वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय राज्य किंवा केंद्र सरकारने घेतलेले नाहीत. उलट ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात येत आहे. त्यामुळे कांदा व धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी हानी होत आहे.

देशात मोठ्या प्रमाणावर कांदा व इतर पिकं निर्यात शुल्कामुळे सडली. परंतु सरकारने त्याची निर्यात करू दिली नाही, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात असलेले आपले धोरण बदलणे नितांत गरजेचे आहे. जोपर्यंत सरकार कृषी क्षेत्राला अधिक प्राधान्य देणार नाही, तोपर्यंत देशातील शेतकरी सुखी होऊ शकत नाही, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT