Chandrapur Political News : राज्यात बेरोजगारीचा भस्मासुर आहे. आपल्या उज्वल भविष्याची वाट बघत तरुण अभ्यास करून प्रचंड परिश्रम घेत आहेत. चार हजार पदांसाठी दहा लाखांहून जास्त अर्ज येत आहेत. अशा स्थितीत शासनाने नऊ खासगी कंपन्यांमार्फत कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे. (It is a worthless government that makes the future of the youth dark)
तरुणांच्या आयुष्याची वाट लावणारा हा निर्णय आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करण्यासाठी तरुणांना रस्त्यावर उतरावे लागेल. आंदोलन करून सरकारला आदेश मागे घेण्याचा निर्णय घेण्यास बाध्य करावे लागेल. तरुणांचे भविष्य अंधकारमय करणारं हे नालायक सरकार आहे, अशी कडवट टीका करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
तरुणांच्या अपेक्षाभंग करण्याचे पाप करू नका, असेही वडेट्टीवार म्हणाले. निवडणुकांच्या (Election) तोंडावर सरकारने नोकर भरती काढली. यानंतर सहा सप्टेंबर रोजी यापुढे शासकीय नोकर भरती कंत्राटी पद्धतीने घेण्याबाबत आदेश काढला. शासनाचा हा निर्णय अतिशय घातक आहे. राज्यातील लाखो तरुणांना नैराश्याच्या खाईत टाकणारी सरकारची ही भूमिका चुकीची आहे.
हा निर्णय मागील सरकारचा आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) सांगत आहेत. मात्र, ते चक्क खोटं बोलत आहेत. खासगी कंत्राटीचा निर्णय हा सहा सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात आला. तरुणांच्या आयुष्याची वाट लावू बघणाऱ्या या सरकारच्या धोरणाविरोधात तरुणांनी आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मोठं आंदोलन करून हा निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे लागेल.
पवार फसवणूक करत आहेत...
खासगी नोकरी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर अजित पवार खोटं बोलत आहेत. ते तरुणांची फसवणूक करीत आहेत, असे सांगत वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. खासगी नोकरी कंत्राटी देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आम्ही तीव्र विरोध करूच, पण तरुणांनी आपले अंधकारमय भविष्य लक्षात घेता आता आक्रमक होऊन आरपारची लढाई लढण्याची गरज आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.