Nitesh Rane, Aditya Thackeray, Varun Sardesai, Nilesh Rane
Nitesh Rane, Aditya Thackeray, Varun Sardesai, Nilesh Rane Sarkarnama
विदर्भ

राणे बंधूंविरोधात वाडी पोलिस ठाण्यात तक्रार, आदित्य ठाकरेंना दिली होती धमकी...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भोंगे आणि हनुमान चालिसा यांवरून राजकारण दिवसागणिक तापत चालले आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुले निलेश (Nilesh Rane)नितेश राणे (Nitesh Rane) यांनी युवा सेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व सचिव वरूण सरदेसाई यांना झोडपून काढण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या विरोधात येथील वाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

युवा सेनेचे पूर्व विदर्भ सचिव हर्षल काकडे यांनी राणे बंधूंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निलेश व नितेश राणे हे कुख्यात गुन्हेगार आहेत. यांपैकी नितेश जीवे मारण्याच्या खटल्यामध्ये मुख्य आरोपी आहेत आणि सद्यःस्थितीत ते जामिनावर आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान ५०६ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काकडे यांनी केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी वाडीचे पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांनी काल दिले.

निवेदनात काकडे म्हणतात, यापूर्वीही नितेश व निलेश राणे यांच्या विरोधात खून, खुनाचा कट रचणे, धमकावणे अशा अनेक तक्रारी झालेल्या आहेत. पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आणि युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना मारू, अशी धमकी राणे बंधूंनी जाहीररीत्या दिलेली आहे. याशिवाय वरूण सरदेसाई यांना झोडपून काढू, अशी धमकी निलेश राणे यांनी दिली आहे. त्यामुळे युवा सेनेच्या दोन्ही नेत्यांच्या सुरक्षेसाठी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जेरबंद करणे गरजेचे आहे. धमक्यांची दखल घेऊन राणे बंधूंच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत विजय मिश्रा, काटोल विधानसभा संघटक प्रमुख मोहीत कोठे, स्वप्निल चोखांद्रे आणि युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशारा दिल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. गेल्या चार दिवसांपासून राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. आता नागपूरच्या युवा सेनेने राणे बंधूंच्या विरोधात तक्रार दिल्याने वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT