मुंबई : महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच त्यांच्या पोस्टमुळे समाजमाध्यमांवर चर्चेत असतात. ते नेहमीच व्हिडिओ शेअर करीत असतात. सध्या त्यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ चर्चेत आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओचं कौतुक होत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहे. आनंद महिंद्रांनी केलेलं ट्विट आदित्य ठाकरे (aditya thackeray)यांनी रिट्विट केलं आहे. (Anand Mahindra News)
आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांचं आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलं आहे. मुंबईतील बस स्थानकाचा कायपालट केल्याबद्दल महिंद्राकडून कौतूक करण्यात आलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विट करत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. आदित्य ठाकरे यांनीही महिंद्रांचे आभार मानले आहेत. त्यांचा व्हिडीओ पोस्ट करताना आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, अखेर मुंबईत जागतिक दर्जाची बस स्थानकं तयार होणार आहेत. एक्सरसाईज बार आणि हिरव्या छतासारख्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह पाहणं खूपच सुंदर आहे. वाह, आदित्य ठाकरे आणि इक्बालसिंग चहल.
@csankush111 या यूजरने आनंद महिंद्रांचं हे ट्विट रिट्विट केलं आहे. ''या छतावर सोलर पॅनल लावले असते, तर वीज निर्मिती झाली असती. त्यामुळे ईलेक्ट्रिक बिलबोर्ड चालवता आले असते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळालं असतं. एक्सरसाईज बार ठिक आहे, पण ग्रीन छताबद्दल मी सहमत नाही. याला पाणी कोण घालणार आणि त्याची देखरेख करण्याचं काम कोण करणार?''
महिंद्रांच्या टि्वटला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात,"आनंद महिंद्रांजी आभार. आपल्या शहरांमध्ये आरामदायक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि शहरांच्या सौंदर्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचाच यामागचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही वातानुकूलित ईलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवत आहोत, त्यामुळे नागरिकांसाठी सर्व बस स्थानकंही चांगली असतील, याकडे लक्ष देत आहोत,"
"चांगला प्रश्न आहे. मी सुद्धा हा प्रश्न विचारला होता. गार्डनच्या आजूबाजूला असणाऱ्या बस स्थानकांवरच हिरवे छत आणि एक्सरसाईज बार असतील कारण हे ओपन स्पेसमध्ये आहे. जिथं शक्य असेल, तिथे छतावर सोलर पॅनल लावले जातील. बस स्थानक स्वच्छ राहावीत हाच याचा मुख्य उद्देश आहे," असंही महिंद्रांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं आहे. सध्या हे टि्वट आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर चर्चेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.