Congress upset with Amar Kale : नगरपालिका आणि नगर परिषदेत महाविकास आघाडीत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे. कुठे आघाडी, तर कुठे बिघाडी, झाल्याचे बघायला मिळते. वर्धा जिल्ह्याच्या खासदारांनी काँग्रेसच्या इच्छुकांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याने मोठा असंतोष उफाळून आला आहे. त्यांनी 25 पैकी 21 जागा राष्ट्रवादीला दिल्या.
नगराध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले असले तरी उमेदवारी त्यांनी आपल्याच जवळच्या माणसाला दिली असल्याने खासदार अमर काळे यांच्यावर काँग्रेसचा रोष व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास आमदार सुमित वानखडे यांना याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आर्वी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि भाजपचा (BJP) बालेकिल्ला आहे. अमर काळे हे सुद्धा याच मतदार संघाचे आमदार होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाविकास आघआडीचे ते उमेदवार होते. ते निवडूनसुद्धा आले आहेत. आता ते राष्ट्रवादीचे झाले असल्याने काँग्रेसला डावलणे सुरू केले आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. खासदार यांच्याच नेतृत्वात आर्वी नगर परिषदेच्या निवडणुकीचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व पालिका आघाडीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आर्वीचे नगराध्यक्षपद काँग्रेसला (Congress) देण्याचे ठरले होते.
25 नगरसेवकांच्या या पालिकेत काँग्रेसच्या फक्त चार नगरसेवकांना एबी फॉर्म देण्यात आला. उर्वरित 20 जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या आहेत. काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी दुसरेच नाव बैठकीत ठरले होते. त्यावर एकमत झाले होते. मात्र अंजली स्वप्नील जगताप यांनी भरला. त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. तत्पूर्वी नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांसाठी तीन इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती. त्यास मान्यताही देण्यात आली होती.
अंतिम यादीनुसार सर्व इच्छुकांना त्याची कल्पना देण्यात आली होती. सर्व उमेदवार काँग्रेसच्या कार्यालयात दुपारी अडीच वाजेपर्यंत एबी फॉर्मची प्रतीक्षा करीत बसून होते. तीन वाजायच्या आत उमेदवारी दाखल करणे आवश्यक होते. मात्र शेवटपर्यंत एबी फॉर्म उमेदवारांपर्यंत पोहचलेच नाहीत.
विशेष म्हणजे, वर्धा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र खासदारांनी एबी फॉर्मसाठी शेवटपर्यंत काँग्रेसच्या इच्छुकांना ताटकळत ठेवले. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या नावावर सर्वांचे एकमत झाले होते. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद मोहड, शहर अध्यक्ष सुधाकर भुयार यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र एका दुसऱ्याच उमेदवाराला काँग्रेसच्या काही नेत्यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते शैलेश अग्रवाल यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.