

Aghori ritual outside Ajit Pawar residence : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळं ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलं आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार मात्र वेगवेगळ्या आरोपांनी घेरलं जात आहे.
मोठ-मोठाल्या घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अजितदादांना सत्तेत असून देखील कारभार करणं जड होऊन बसलं आहे. यातच आता त्यांच्या बारामतीमधील निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा झाल्याचं समोर आलं आहे. एका राष्ट्रीय पक्षाबरोबर राज्याच्या नेतृत्व करत असलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर अशी अघोरी पूजा केल्याचं साहित्य आढळल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील (Baramati) घराबाहेर अघोरी पूजा करण्यात आली आहे. फोडलेले नारळ, फुलं, हळद-कंकू, कापलेले लिंबू अन् नैवेद्य रस्त्याच्या मधोमध ठेवत अघोरी पुजेचा प्रकार घडला आहे. हा प्रकार कोणी केला, याची कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी वातावरण तापलं आहे. याच काळात अजित पवारांच्या (Ajit Pawar) घराबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार झाल्याने राज्यात चर्चांना उधाण आले आहे. ही अघोरी पूजा कुणी केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमधील सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजा करण्यात आली. पवारांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर फोडलेले नारळ, फुलं, हळद-कंकू, कापलेले लिंबू अन् नैवेद्य ठेवण्यात आला. ही अघोरी पुजेचा प्रकार असल्याची चर्चांनी बळ घेतलं. कोणी या पुजेच्या प्रकाराला भानामतीचा प्रकार असल्याचे म्हटले. त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं होतं.
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी हा अघोरी पूजेचा प्रकार पाहिल्यानंतर बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली. निवडणुकीच्या तोंडावर, असा प्रकार घडल्याने बारामतीमधील नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. काही वेगळेचं करण्याच्या हेतुने हा प्रकार केल्याची जोरदार बारामतीकरांमध्ये होती.
निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने कुणाचे तिकीट मिळवण्यासाठी किंवा कुणाचे तिकीट कापण्यासाठी हा प्रकार केला की काय? अशा देखील चर्चा सध्या आहेत. सध्या राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये सर्वात अडचणीच्या आणि कठीण काळातून अजितदादा जात आहे. सध्या घोटाळ्याच्या आरोपांची मालिका त्यांच्याभोवती सुरू आहे. तर त्यांच्या पक्षातील मंत्री वादग्रस्त विधानानं घेरली जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.