Amar Kale Sarkarnama
विदर्भ

Amar Kale Wardha Lok Sabha Winner: रामदास तडस यांची घौडदौड पवारांच्या शिलेदाराने रोखली, वर्ध्यात 'तुतारी' वाजली

Wardha Lok Sabha Election Result 2024 Live: वर्धा लोकसभेचा निकाल समोर आला आहे. या मतदारसंघात भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात थेट लढत झाली होती.

Jagdish Patil

Wardha Lok Sabha Constituency : वर्धा लोकसभेचा निकाल समोर आला आहे. या मतदारसंघात भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात थेट लढत झाली होती. तर अखेर येथील मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या गळ्यात खासदारकीची माळ घातल्याचं स्पष्ट झालं आहे. रामदास तडस यांच्यावर त्यांच्या सुनेनं केलेल्या आरोपामुळे हा मतदारसंघ पहिल्यापासून चर्चेत राहिला होता.

महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला वर्धा लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात. सहा विधानसभा मिळून जिल्ह्यात यंदाच्या लोकसभेसाठी सरासरी 64.85 टक्के मतदान झालं. 2019 च्या लोकसभेच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील वाढीव मतदानामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं टेन्शन वाढवलं होत. पण हे वाढीव मतदान आता महाविकास आघाडीसाठी फायद्याचं ठरलं आहे.

वर्धा मतदारसंघ हा नेहमी काँग्रेसचा गड राहिला आहे. आतापर्यंत या लोकसभा मतदारसंघात नेहमी काँग्रेस विरुद्ध इतर पक्ष अशी लढत झाली आहे. परंतु, 2024 च्या निवडणुकीत मात्र इथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता. त्यामुळे आजपर्यंतची काँग्रेसची परंपरा यावेळी मोडीत निघाली आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीतही भाजपाकडून खासदार रामदास तडस रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अॅड. चारुलता ठोकस यांनीही लोकसभेच्या मैदानात आपले भविष्य आजमावले होते.

टोकस यांची मतदारसंघात असणारी अनुपस्थिती तसेच केंद्रातील भाजप सरकारची विकासकामे लक्षात घेऊन मतदारांनी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या बाजूने कौल दिला होता. तडस यंदा तिसऱ्यांदा ते खासदारकीसाठी रिंगणात होते मात्र त्यांची घौडदौज आता अमर काळे यांनी रोखली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT