Kishor Jorgewar
Kishor Jorgewar Sarkrnama
विदर्भ

Kishor Jorgewar News: महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणे आम्हाला बंधनकारक नाही...

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Graduate Constituency Election : नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चार ते पाच प्रमुख उमेदवार लढत आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यातील विदर्भ (Vidarba) माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचाही समावेश आहे. चंद्रपूर शहराचा आमदार म्हणून माझी भूमिका त्यात निर्णायक आहे, असे लोकांना वाटत आहे, पण तसे काहीही नाहीये, असे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

यासंदर्भात आज नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी बोलताना आमदार जोरगेवार (Kishor Jorgewar) म्हणाले, ही निवडणूक (Election) लढत असलेल्या सर्व उमेदवारांना मला भेटीची वेळ मागितली आहे. पण अजून कुणाशीही भेट झालेली नाही आणि यासंदर्भातील भूमिका अद्याप ठरवलेली नाही. आम्ही अपक्ष आमदार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहोत. पण आम्हाला सत्तेतील संबंधिकांकडून कुठलेही निर्देश अद्याप आलेले नाहीत.

या निवडणूकीत चंद्रपूरचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांच्यात मुख्यत्व करून लढत होईल असे वाटते. पण माझ्यासह एकुणच महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांनी याबाबत काही निर्णय घेतलेला नाही. आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारनंतर कोण कोण माघार घेतं, हे कळेल. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर कदाचित आमचाही काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या चांगल्या निर्णयांना आमचा पाठिंबा..

सभागृहाच्या पटलावर, सरकारच्या चांगल्या कामांसाठी आणि चांगल्या निर्णयांसाठी आमचा सरकारला पाठिंबा आहे. ठिकठिकाणची परिस्थिती बघून अपक्ष आमदार आपला निर्णय घेत असतात. महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी असलो तरी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, हे आम्हा अपक्षांना बंधनकारक नाहीये. त्यामुळे योग्य वेळी आम्ही आपला निर्णय घेऊ.

अद्याप मागणी नाही..

या क्षणापर्यंत महायुतीचे नेते किंवा उमेदवारांकडून आम्हाला समर्थन मागण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्याच निर्णय घेण्याची घाई नाही. जेव्हा नेत्यांकडून काही सूचना येतील आणि उमेदवार ॲप्रोच होतील, तेव्हा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT