Medha Patkar Latest News Sarkarnama
विदर्भ

Medha Patkar : बलात्काऱ्यांचे स्वागत आम्हाला मान्य नाही...

Medha Patkar : धोरणे चुकली की मग आम्ही लोक पुढे येतो.

अतुल मेहेरे

वाडेगाव (जि. अकोला) : आज देशात धर्मांधता जातीयता सर्वत्र पसरविली जात आहे. आम्ही ज्या मुद्द्यांवर काम करतो, ते मुद्दे सुद्धा भारत जोडो यात्रेमध्ये समाविष्ट झालेले आहेत, असे ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर म्हणाल्या. (Medha Patkar Latest News)

धर्म आणि जातीच्या नावाने हिंसा अत्याचार करणे वाढले आहे. बलात्कारी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांचे खुलेआम स्वागत केले जाते, हे आम्हाला मान्य नाही. राहुल गांधी यांनी आत्ताचे पाऊल उचलले आहे, ते युवा राजकारण्यांना आंदोलनकारी बनविणारे आहे. केवळ पक्षीय राजकारणात अडकून राहणे हे लोकशाहीची मूल्य टिकविणारे राजकारण असू शकत नाही. त्यामुळे लोकांना अवकाश देणं आणि स्वतःसाठी स्पेस निर्माण करणे भारत जोडो यात्रेमधून होत आहे.

हा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न आहे पण त्याही पलीकडे जाऊन राहुल गांधी आर्थिक सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा करत आहेत कालच त्यांनी आमच्यासोबत विविध विषयांवर जवळपास एक तास चर्चा केली, असेही नेता पाटकर म्हणाल्या. हे सर्वच राजकारण्यांनी केलं पाहिजे तेव्हाच कुठे जनवादी लोकशाही टिकून राहील, असेही त्या म्हणाल्या.

देशात आमूलाग्र परिवर्तनासाठी या एकाच यात्रेवर तुम्ही भरोसा नाही करू शकत, असे राहुल गांधींनी सांगितल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या. सत्तेमध्ये असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाची धोरणे असतात. ही धोरणे चुकली की मग आम्ही लोक पुढे येतो बहुतेक वेळा विरोधी पक्षाची भूमिका आम्ही पार पडतो. संविधान बचाव यात्रा चालवणारी आमची टीम होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये जसा विजय मिळाला, तसा याही वेळी मिळेल, अशी आशा मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT