नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात,अॅट्रोसिटीचा गुन्हा अखेर दाखल

Nawab Malik : पेन ड्राईव्हचा पुरावाच निर्णायक ठरला.
Nawab Malik and Sameer Wankhede Latest Marathi News
Nawab Malik and Sameer Wankhede Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मनी लॉंड्रिग प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. कारण वाशीम पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अट्रोसिटीचा गुन्हा काल (ता.१६ नोव्हेंबर) दाखल केला. त्यामुळे त्यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत.

मलिकांविरुद्ध अट्रोसिटी दाखल करण्याचा आदेश वाशीम सत्र न्यायालयाने परवा (ता.१५ नोव्हेंबर) दिला होता. त्यानंतर २४ तासात वाशीम पोलिसांनी तो दाखल केला. मात्र, त्यांनीच त्यापूर्वी वर्षभर तो नोंद केला नव्हता. त्याबाबतच्या तक्रारीची त्यांनी दखलच घेतली नव्हती. मात्र, न्यायालयाने दणका देताच लगेच त्यांनी गुन्हा नोंदविण्याची कारवाई आता काल केली.

Nawab Malik and Sameer Wankhede Latest Marathi News
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या स्वागतासाठी संतनगरी सज्ज; काँग्रेस नेते शेगावात दाखल...

काल गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी एनसीबीचे मुंबई विभागाचे तत्कालीन उपसंचालक समीर ज्ञानदेव वानखेडे यांचे सख्खे चुलत बंधू संजय शंकरराव वानखेडे (वय ५२, रा. वाशीम) यांनी वर्षभरापूर्वी ६ नोव्हेंबर २०२१ रोजी वाशीम पोलिस ठाण्यात मलिक यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र, त्यावेळी मलिक हे मंत्री असल्याने त्याची दखलच पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांनी वाशीमच्या एसपींकडे हा तक्रार अर्ज करून कारवाईची मागणी केली. मात्र, त्यांनीही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. म्हणून अखेरीस संजय वानखेडे यांनी वाशीम सत्र न्यायालयात ३ डिसेंबर २०२१ रोजी धाव घेतली होती. त्यावर परवा वरील निर्णय आला. त्यामुळे मलिकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी लेवलचा अधिकारी करतो. तसेच त्यात अटक झाली, तर ईडीच्या गुन्ह्यांप्रमाणे लगेचच जामीनही मिळत नाही.

Nawab Malik and Sameer Wankhede Latest Marathi News
Rahul Gandhi : सावरकरांचा माफीनामा राहुल गांधींनी वाचून दाखवला ; फडणवीस, भागवतांनाही टोमणा

समीर वानखेडेंसह मी व आमचे एकत्र कुटुंब हे अनुसूचित जातीचे (महार) असूनही समीर हे जन्माने मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा अप्रचार मलिक यांनी अनेकदा पत्रकारपरिषद घेऊन केला. तसेच महार जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन समीर यांनी नोकरी मिळवली, लाभ घेतला, असेही ते म्हणाल्याने वानखेडे कुटुंबाची बदनामी झाली, असे संजय यांनी न्यायालयातील आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Nawab Malik and Sameer Wankhede Latest Marathi News
Shivsena : उद्धव ठाकरे प्रामाणिक, तुम्हीच धोका दिला म्हणून उपमुख्यमंत्री व्हावे लागले..

मलिकांच्या (Nawab Malik) आरोपांमुळे आमच्या कुटुंबाचा अपमान झाला, आमची मनस्थिती बिघडली, आम्ही तणावात गेलो, कुटुंबाची हानी झाली, आम्हाला त्रास झाला. हे अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा होत असल्याने मलिकांविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केली होती.

मलिक यांचे जावई समीरखान यांना अंमली पदार्थ जवळ बाळगल्याबद्दल समीर यांनी अटक केली होती. त्या रागातून त्यांनी समीर यांच्यावर त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे व ते मुस्लिम असल्याचे आरोप केल्याचे तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले होते.

पुराव्यादाखल मलिक यांनी मि़डीयासमोर समीर यांच्यावर ते मुस्लिम असल्याचे तसेच त्यांचे अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याच्या केलेल्या आरोपाचे वक्तव्य हे पेन ड्राइव्हमध्ये न्यायालयात सादर करण्यात आले होते. हा पेन ड्राईव्हचा पुरावाच निर्णायक ठरला. त्यामुळे सुनावणीत तक्रार ग्राह्य धरीत न्यायालयाने मलिक यांच्याविरुद्ध अट्रोसिटीनुसार गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com