Ajit Pawar
Ajit Pawar  Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : शिंदे गटातील आमदारांच्या 'वाय प्लस' सुरक्षेला किती खर्च? अजितदादांनी आकडाच सांगितला...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Winter Session News : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी विविध मुद्द्यावंरून विरोधक-सत्ताधारी आमने-सामने आले. अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या 'वाय प्लस' सुरक्षेवरून सरकारवर जोरदार टीका केली. एका 'वाय प्लस' सुरक्षेसाठी किती खर्च लागतो, याचा अजितदादांनी आकडाच सांगितला.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना सोडून शिंदे गट स्थापन केला. मात्र यातून ते अद्याप बोहर आलेले दिसत नाहीत. जे सभागृहाचे सदस्य नाहीत, ते त्यांच्याबाबत सांगतात. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत विधानसभेत सांगण्याचा काय संबंध?'' असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

''आम्ही वेगवेगळ्या गोष्टी या अधिवेशनामध्ये उपस्थित केल्या. त्यामध्ये आरोप झालेल्या मंत्र्यांची हकालपट्टी करा, जे आमदार काहीही बोलतात त्या आमदारांना ताकीद करा, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना हटवा, यासह अनेक मागण्या आम्ही केल्या. मात्र सरकारकडून यातील कोणत्याच गोष्टीला स्पर्श करण्यात आला नाही'', असं ते म्हणाले.

''खरं तर शिंदे गटाच्या ३० ते ३५ आमदारांना 'वाय प्लस' सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र एक 'वाय प्लस' सुरक्षा देण्यासाठी २० लाख रुपयांचा खर्च येतो. मग शिंदे गटाच्या ३० ते ३५ आमदारांना ही 'वाय प्लस' सुरक्षा कशासाठी देण्यात आली आहे. अर्थात गरज असेल तर सुरक्षा पुरवली पाहिजे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील. पण विरोधी पक्षातील अनेकांची सुरक्षा काढण्यात आली. तर सरकारमधील नेत्यांना, आमदारांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे'', असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवारांनी जोरदार टीका केली.

दरम्यान, नागपूरमध्ये (Nagpur) सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन आज आटोपलं. या अधिवेशनामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. तर अनेक वेळा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. तर यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे २७ फ्रेब्रुवारीला मुंबईत (Mumbai) होणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT