Eknath Shinde गटाच्या दादागिरीने गाजला होता अधिवेशनाचा पहिला दिवस...

Eknath Shinde Group : दादागिरी करीत शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या कर्मचाऱ्यांना हाकलून लावले.
Assembly Winter Session
Assembly Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session News : नागपूर (Nagpur) हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्याच दिवशी शिवसेनेचे कार्यालय कुणाचे यावरून वाद पेटला होता. त्यावर दादागिरी करीत शिंदे गटाने (Eknath Shinde) उद्धव ठाकरे गटाच्या कर्मचाऱ्यांना हाकलून लावले. त्यापूर्वी विरोधकांनी पायऱ्यांवर ‘५० खोके, एकदम ओके...’च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

आधी उद्धव ठाकरे सेनेचे कर्मचारी कार्यालयात होते. तेथे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. पण पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे सेनेने दादागिरीने त्या कार्यालयावर ताबा मिळविला. तेथील कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने बाहेर काढण्यात आले. ठाकरे सेनेचे सर्व फोटो काढून तेथे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले. दोन महिला कर्मचारी, ज्या ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेच्या कार्यालयात काम करतात, त्यांना दमदाटी करून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. या दादागिरीचा विरोध परिसरात जवळपास सर्वांनी केला.

बावनकुळेंनी वाटले लाडू..

दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील ७७५१ ग्रामपंचायतींचे निकाल लागले. या दिवशी दुपारी १ वाजताच्या सुमारास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भाजप समर्थीत उमेदवार निवडून आल्याची घोषणा केली. या आनंदात त्यांनी विधानभवन परिसरात लाडू वाटून आनंद साजरा केला. तिसऱ्या दिवशी आमचेच सरपंच जास्त निवडून आल्याची घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आणि त्यांच्याकडून लाडूच्या प्रत्युत्तरात पेढे वाटण्यात आले. त्यानंतर ४.५ एकरचे एनआयटीचे भूखंड १६ लोकांना नियमबाह्य पद्धतीने दिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लाऊन धरली.

Assembly Winter Session
Winter Session : ...म्हणून अखेर भाजप आमदारानेच विधानसभेत काढला 'GST'च्या पैशांचा मुद्दा!

आदित्य ठाकरे झाले टारगेट.. या प्रकरणातील हवा काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना अडचणीत आणत दिशा सालियन प्रकरण उकरून काढले. ‘५० खोकें...’ च्या घोषणा जवळपास रोजच विरोधक देत होते. त्यानंतर चौथ्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी टाळ वाजवत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी वारकऱ्यांच्या समर्थनार्थ टाळ वाजवत त्यांची हवा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या सुषमा अंधारेंचा जोरदार विरोध सत्ताधाऱ्यांनी केला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com