Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक देश- एक निवडणूक'चा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवला जात आहे. डाव्या विचारांच्या पक्षाचाही यास विरोध आहे. याचे देशावर काय दुष्परिणाम होईल याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी दिली.
'मुळाच एक देश एक निवडणूक हे धोरणच घटनाबाह्य असून त्यामुळे नागरिकांचा अधिकार हिरावला जाणार आहे. यास सर्व पातळीवर आमचा विरोध राहील. संघराज्य असणारा आपला देश आहे. विविधतेत एकता आपले वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेने लोकसभा व विधानसभेच्या सदस्यांची कालमर्यादा निश्चित केली आहे. निवडणूक आयोग (Election Commission) घटनात्मक संस्था आहे. निष्पक्ष व चांगल्या वातावरणात नियमित निवडणुका घेण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. भाजपच्या आग्रहामुळे संपूर्ण यंत्रणेचा पाया कोलमडेल. राज्याचे अधिकार घेतले जातील. त्यामुळे या निर्णयास आमचा विरोध असल्याचे आयोग व समितीला कळवले आहे, असेही डी. राजा यांनी सांगितले.
भाकपचे माजी सरचिटणीस दिवंगत ए.बी. बर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या प्रारंभानिमित्त पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी नागपुरात सुरू झाली. यानिमित्त राजा (D Raja) येथे आले आहेत. ते म्हणाले, महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांच्या अजेंड जवळपास एकच आहे. देशाची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात इंडिया आघाडी अधिक भक्कम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. जातनिहाय गणना व्हावी, ही आमची आग्रही भूमिका आहे. न्यायपालिकेने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के केली असल्याने त्यांनीच यात हस्तक्षेप करावा. न्यायपालिकेने खासगी क्षेत्रातील आरक्षणाचाही प्रश्न निकाली काढावा, असेही डी राजा म्हणाले.
डाव्या पक्षांची राजकीय विचारधारा आणि निवडणुकीचे तंत्र यात मोठी दरी निर्माण झाली आहे. कुठलाही समझोता केला जात नाही, उजव्या विचारसरणीसोबत लढणारा आणि जनतेला अडचणीत आणणाऱ्या खुल्या अर्थव्यवस्थेविरोधात आवाज उठवणारे, अशी डाव्या पक्षांची विश्वासार्हता आहे. निवडणुकीत विविध घटक प्रभाव करत असतात. त्यामुळे निर्माण झालेली दरी कशी दूर करता येईल, यावर मंथन चालले आहे, असेही डी. राजा यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.