Vidarbha Politics : अमित शहांच्या ‘टार्गेट’ला मित्रपक्ष शिवसेनेकडूनच सुरुंग; सर्व्हेचा हवाला देत 24 जागांवर केला दावा

Mahayuti Assembly Election Strategy : लोकसभा निवडणुकीत सर्व्हेचे कारण सांगून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक उमेदवार बदलायला भाग पाडले होते. त्यातूनच रामटेक आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार शिवसेनेने बदलले होते. नव्याने उमेदवारी दिलेले दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत.
Eknath Shinde-Sanjay Rathod-Amit Shah
Eknath Shinde-Sanjay Rathod-Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 26 September : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भातील ६२ मतदारसंघापैकी तब्बल २४ जागांवर दावा केला आहे. आम्ही विदर्भात केलेल्या सर्व्हेमध्ये या जागा आम्हाला अनुकूल दर्शवण्यात आल्याचे राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे म्हणणे आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षांची समजूत घालून या जागांवर उमेदवार उभे करू, असा दावाही मंत्री राठोड यांनी केला आहे.

भाजपचा (BJP) गड मानल्या गेलेल्या विदर्भातील (Vidarbha) ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट अमित शहा यांनी पक्षाच्या नेत्यांना दोन दिवसांपूर्वी दिले आहे. सोबतच त्यांनी महायुतीबाबतच्या शंका-कुशंक मनातून काढू टाका. महायुतीमधील (Mahayuti) तीनही पक्ष एकत्रच निवडणूक लढणार आहेत, राज्यात महायुतीची सत्ता आणायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करताना आणि मतदान करताना भेदभाव न करता महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.

दरम्यान, भाजपने ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले असले तरी सुमारे निम्या जागांवर शिवसेना (Shivsena) आग्रही राहिल्यास भाजपची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत भाजपने विदर्भातील ४२ जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत सर्व्हेचे कारण सांगून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक उमेदवार बदलायला भाग पाडले होते.

Eknath Shinde-Sanjay Rathod-Amit Shah
Vishwajeet Kadam : विश्वजित कदम यांनी घेतली शरद पवारांची भेट; काय आहे कारण?

त्यातूनच रामटेक आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार शिवसेनेने बदलले होते. नव्याने उमेदवारी दिलेले दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे या सर्व्हेवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हा सर्व धोका टाळण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनेसुद्धा विदर्भातील ६२ मतदारसंघात सर्व्हे केला. यापैकी २४ जागांवर आमची चांगली स्थिती असल्याचे समोर आले असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.

नागपूर विमानतळावर बोलताना ते म्हणाले, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांत शिवसेनेला प्रतिनिधित्व हवे आहे. प्रत्येक जिल्ह्यात आमचा आमदार असावा, अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे.

Eknath Shinde-Sanjay Rathod-Amit Shah
Dharmraj Kadadi : काडादींनी वाढविले महाआघाडीतील इच्छुकांचे टेन्शन; ‘दक्षिण’च्या रणांगणात उतरण्याचे थेट संकेत

शिवसेनेला २४ जागा दिल्यास ३८ मतदारसंघ शिल्लक राहतात. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही जागा सोडाव्या लागणार आहेत. हे बघता विदर्भात जागा वाटपावरून महायुतीत मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com