Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Fadanvis: वाळू चोरणारे नेते असो वा अधिकारी, सोडणार नाही; फडणवीसांचा इशारा कुणाला ?

Atul Mehere

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू चोरणारे नेते असो वा अधिकारी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा दिला होता. आता वाळू चोरी करणारा जिल्ह्यातील नेता कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक जण यावर तर्कवितर्क लढवत आहे.

कोळसा खाणी आणि व्यवसायावर आधारित मिनकॉन परिषद नागपुरात (Nagpur) गेल्या आठवड्यात पार पडली. त्यावेळी फडणवीसांनी (Devendra Fadanvis) हा इशारा दिला होता. नागपूर जिल्ह्यात मोठ्‍या प्रमाणात वाळू घाट आहेत. यात मोठमोठे व्यावसायिक, वाळू माफिया (Sand Mafiya) गुंतले आहेत. त्यांना काही राजकीय नेत्यांचा (Political Leaders) आर्शीवाद लाभला आहे. वाळू घाट जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे पहिले लक्ष सावनेर, कामठी, उमरेड, रामटेक (Ramtek) आणि काटोल विधानसभा मतदारसंघाकडे जाते. याच मतदारसंघात सर्वाधिक नद्या आणि वाळू घाट आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahaikas Aghadi) कार्यकाळात वाळू घाटावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ठिणगी पडली होती.

पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सावनेर मतदारसंघातील काही घाटांवर धाडी टाकल्या होत्या. मात्र नंतर लगेच हे प्रकरण शांत झाले होते. वाळू घाटावरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये धुसफुस सुरू झाली होती. राज्यात शिंदे सेना-भाजपची सत्ता आल्यानंतर भाजप ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी वाळू चोरी, बनावट टीपीद्वारे होत असलेल्या उपस्याची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पोलिस आयुक्तांकडे केली होती. मध्य प्रदेशातील टीपीवर नागपूरमध्ये वाळूचा उपसा केला जात असल्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली होती.

काही नेत्यांच्या नावाचाही उल्लेख त्यांनी आपल्या तक्रारीत केला होता. अलीकडेच पोलिसांनी वाळू चोरट्‍यांवर मोठी कारवाई केली होती. ग्रामीण भागातील काही नेत्यांच्या समर्थकांवर गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान कोणाला तरी इशारा देणारे आहे, असे दिसून येते. त्यांचा रोख काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यांकडे असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT