‘वैभव नाईक कितीही मोर्चे काढा; हे शिंदे-फडणवीस सरकार आहे, चुकीला माफी नाही’

आम्ही आयुष्यभर काबाडकष्ट करतो. मुंबईत चाकरमानी म्हणून काम करतो, तरीही आमची संपत्ती वाढत नाही. तुमची संपत्ती वाढायला, तुम्ही काय जादूगार आहात काय?
Pravin Darekar-Vaibhav Naik
Pravin Darekar-Vaibhav NaikSarkarnama

कुडाळ : आम्ही आयुष्यभर काबाडकष्ट करतो. मुंबईत चाकरमानी म्हणून काम करतो, तरीही आमची संपत्ती वाढत नाही. तुमची संपत्ती वाढायला, तुम्ही काय जादूगार आहात काय? वैभव नाईक कितीही मोर्चे काढा. हे शिंदे-फडणवीस सरकार आहे. चुकीला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही, असा कडक इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना दिला आहे. (MLA Pravin Darekar's challenge to Shiv Sena MLA Vaibhav Naik)

Pravin Darekar-Vaibhav Naik
MCA Election : नार्वेकरांनी घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते; विजयानंतर उद्धव ठाकरेंचा फोन

आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या वतीने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नाईक समर्थकांनी काढलेल्या मशाल मोर्चाला आमदार दरेकर यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले आहे. या वेळी आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार, आमदार नीतेश राणे, नीलेश राणे आदींसह भाजपचे नेते उपस्थित होते.

Pravin Darekar-Vaibhav Naik
लहान भाऊ पोहायला शिकला अन्‌ मला रात्रभर झोपच लागली नाही : अजितदादांची तुफान फटकेबाजी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार वैभव नाईक यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यासंदर्भात बोलताना आमदार दरेकर म्हणाले की, आमदार प्रसाद लाड आणि मला शंभर नोटीसा पाठविल्या होत्या. त्यावेळी आम्ही काय तुम्हाला शिव्या देत बसलो नाही. तुमची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ॲण्टी करप्शन) चौकशी झाली, तर एवढं वाईट घेण्याचे काहीच कारण नाही. तुमची २००९ मध्ये असणारी संपत्ती आणि २०१९ मधील संपती ही जर जास्त दिसत असेल तर तुम्ही काय जादूगार आहात का संपत्ती वाढवायला, असा सवालही दरेकर यांनी या वेळी उपस्थित केला.

Pravin Darekar-Vaibhav Naik
भास्कर जाधव चिपळूण-गुहागरमधून निवडून कसे येतात?, तेच आता बघू : दरेकरांचे चॅलेंज

आम्ही काबाडकष्ट करतो. मुंबईत आयुष्यभर चाकरमानी म्हणून काम करतो. पण आमची संपत्ती काही वाढत नाही. तुम्ही रस्त्याच्या कामात, सरकारी योजनांमध्ये पैसे खाणार असाल आणि तुमची संपत्ती वाढणार असेल तर चौकशी झाली तर दु:ख का वाटून घेता. तुमची चौकशी आम्ही मागितली नाही, ती दुसऱ्याच एका माणसाने मागितली आहे. त्या आधारावर आमदार वैभव नाईक यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे वैभव नाईक कितीही मोर्चे काढा. हे शिंदे-फडणवीस सरकार चुकीला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही. ॲण्टी करप्शनची चौकशी होऊन तुमच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

Pravin Darekar-Vaibhav Naik
क्षीरसागरांचा चकवा कोणाला? : शिवसेनेत असूनही कार्यक्रमाला शिंदे-फडणवीसांना बोलावले!

दरेकर म्हणाले की, पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जी कामे झाली आहेत. त्यांची अण्टी करप्शन आणि सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी आम्ही आगामी अधिवेशनात करणार आहोत. होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com