PM Narendra Modi & Adv. Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : भाजप,आरएसएस कोणी संपवले ?, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Political News : सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकाला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी येथील प्रचार सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Sachin Waghmare

VBA News : लोकसभा निवडणुकीच्या निमिताने सर्वत्र प्रचार शिगेला पोचला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकाला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी येथील प्रचार सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) भाजपचे (Bjp) नाव मिटविले आहे. त्यांनी आरएसएस संपविली. गेल्या दीड वर्षात ते मोहन भागवतांना भेटायला गेले नाहीत. भागवतांनी वेळ मागूनही त्यांनी दिली नाही. पक्ष टिकले तर देशाचा एकोपा टिकतो त्यामुळे संघ व सनातन वाद्यांनी मोदींचं भूत मानगुटीवरून उतरविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. (Prakash Ambedkar News)

यवतमाळच्या वणी येथे चंद्रपूर आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ म्हणजेच आरएसएस व्यक्तीविरोधी आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचे नाव मिटवले अशी टीका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली.

राज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजप बरोबर बसून मॅच फिक्सिंग केली, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. यात नांदेड, भंडारा-गोंदिया, कल्याण, रावेर हे मॅच फिक्सिंगचे मतदारसंघ असून त्याची यादी आपण देऊ शकतो, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या काळात जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर, त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. लोकशाही आणि उमेदवारीचे सामाजिकरण होणं आवश्यक आहे. असेही यावेळी, प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

अकोला मतदारसंघात होणार तिरंगी लढत

अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.अकोला लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर लढवत आहेत. या निवडणुकीसाठी आयोगाकडून त्यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले आहे.

SCROLL FOR NEXT