Prakash Ambedkar News : राज ठाकरेंच्या पाठिंब्याने भाजपचेच नुकसान? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले उत्तर भारतीयांच्या मतांचे गणित

Raj Thackeray : उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारल्याची आठवणही आंबेडकर यांनी करुन दिली.
Prakash Ambedkar Raj Thackeray
Prakash Ambedkar Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Prakasha Ambedkar News : राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. महायुतीच्या प्रचारात राज ठाकरे दिसतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवारी (ता.13) राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेत महायुतीच्या प्रचारासंदर्भात आपली पुढील दिशा स्पष्ट करतील. महायुतीला राज यांना पाठिंबा दिल्याने महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना प्रकाश आंबेडकर यांनी मात्र राज ठाकरेंमुळे भाजपची BJP मुंबईतील उत्तर भारतीय मते दुरावतील, असे सांगत राज ठाकरेंच्या पाठिंब्याने भाजपला नुकसान होईल असे संकेत दिले आहेत.

Prakash Ambedkar Raj Thackeray
MNS News :'राज ठाकरेंची 'ती' भूमिका कधीच बदलली नाही', मनसे कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर नेत्यांची सारवासारव

मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.

मुंबईसारख्या शहरात आधी शिवसेनेनी बजाव पुंगी हटाव लुंगी, असे आंदोलन केले होते. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारल्याची आठवणही आंबेडकर यांनी करुन दिली. त्यामुळे उत्तर भारतीय राज ठाकरेंच्या विरोधात असतील, असे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

वंचित मुंबईतील उमेदवार जाहीर करणार

राज ठाकरे हे भाजपला पाठींबा दिल्याने मुंबईतील राजकीय गणित बलण्याची शक्यता आहे. मनसेची मराठी मते भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर, उत्तर भारतीय मतं भाजपपासून दुरवण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरूनच मुंबईतील उमेदवारांची यादी आज (गुरुवार) सायंकाळपर्यंत वंचित बहुजन आघाडी घोषित करण्याची शक्यता आहे.

Prakash Ambedkar Raj Thackeray
Raghunath Patil News: हातकणंगले मतदारसंघात रघुनाथदादांची एन्ट्री, लोकसभा लढवण्याची केली घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com