Abdul Sattar & Bacchu Kadu Latest News Sarkarnama
विदर्भ

'ये मीठा है, ओ कडू है', बच्चू कडूंबद्दल सत्तार असे का म्हणाले, करावं लागल स्पष्ट

Abdul Sattar : बच्चू कडू हे नाराज नाहीत...

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि राज्यात सत्तांतर झालं, यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार स्थापन झाल आहे. मात्र मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप कमालीचा लांबला. यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती.

त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला मात्र, मात्र मंत्रीपदाची आशा बाळगत असणाऱ्या अनेकांच्या पदरी निराशा पडली. त्यात मंत्रीपद मिळणारच असा कयास लावला जात होता त्यामध्ये प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा. मात्र त्यांनाही यातून वगळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तारांनी कडू यांच्याबद्दल एक मिश्किल टिप्पणी केल्याने त्याची जोरदार चर्चा होता आहे. (Abdul Sattar & Bacchu Kadu Latest News)

अब्दुल सत्तार सध्या अमरावती दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांची भेट घेतली आणि यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पटेल आणि कडू यांच्याबद्दल मिश्किल टीप्पणी केली. ते म्हणाले की, 'ये मीठा है और ओ कडू है',असे सत्तार म्हणाले. मात्र त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहे. यावर सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्टीकरणंही द्याव लागल आहे.

ते म्हणाले की, माझ्या विधानाचा कोणताही वेगळा राजकीय अर्थ नसून बच्चू कडूंच्या नावात कडू असे आहे. आमचे पटेल म्हणजे मीठा राजकुमार आहे. या दोघांमधला मी फरक सांगितला. राज्यात बच्चू कडूंचे चांगले काम आहे. पण त्यांच्या नावात कडू का आहे हे तेच सांगू शकतील, असेही सत्तार म्हणाले. तसेच, बच्चू कडू हे नाराज नाहीत. ते गोरगरीबांचा आवाज उठवणारा व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल कुणी मिश्किल टिप्पणी करू शकत नाही, कारण तेच इतक्या लोकांची मिश्किल टिप्पणी करतात, अशी सावरासावर सत्तारांनी केल्या आपल्या विधानावर केली आहे.

दरम्यान, बंडखोरीनंतर नवं सराकार स्थापन झाल्यावर मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आणि निश्चित नाव हे बच्चू कडू यांचं होतं. यामुळे त्यांनी आधीपासूनच आपल्याला कोणत्या खात्याचं मंत्रीपद हवं, याबाबतही सूतोवाच केलं होते. मात्र, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्या नावाचा समावेश न झाल्यामुळे त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आणि त्यांनी शिंदे यांच्याकडून अश्वासन घेतलं,असे बोललं गेलं. या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी बच्चू कडू यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीला यामुळेही महत्व प्राप्त झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT