Prajakta Tanpure and Raj Thackeray
Prajakta Tanpure and Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

एका पाठोपाठ एक सभा घेणारे राज ठाकरे इकडे लक्ष देतील का ?

Abhijeet Ghormare

भंडारा ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ४ मे च्या नंतर काय होईल, माहिती नाही, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. तेव्हापासून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज ठाकरेंना निशाणा बनवण्यात येत आहे.

राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या भूमिकेवरून त्यांच्यावर चौफेर टिका केली जात आहे. काल गोंदिया ऊर्जा राज्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी गोंदियात आले असता, त्यांनी ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. आपल्या देशाला व राज्याला अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. त्याकडे लक्ष द्यायला राज ठाकरेंना वेळ नाही, मात्र महाराष्ट्रातील (Maharashtra) वातावरण खराब करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे, असे म्हणत तनपुरेंनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले.

केंद्र सरकार कोळसा देत नाही, महागाई वाढली याकडे राज ठाकरेंचे लक्ष नाही याशिवाय अनेक असे प्रश्‍न आहेत, की राज्यासमोर आ वासून उभे आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले पाहिजेत, राज्याने गॅसची कमी केलेली सबसिडी केंद्राने वाढविली आहे, हे मुद्दे महत्वाचे असताना राज ठाकरे फक्त सभांवर सभा घेत आहेत आणि या सभांमधून ते धार्मिक तेढ वाढवण्याचे काम करीत असल्याचा आरोपही प्राजक्त तनपुरे यांनी केला.

देशात 18 राज्यांत भारनियमन होत असतानादेखील महाराष्ट्रात ते होत नाहीये. भविष्यात महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही, याची आम्ही सरकार म्हणून पुरेपूर काळजी घेत आहोत. केंद्राकडून कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याने राज्यावर हे संकट ओढवले आहे. अशाही परिस्थितीत राज ठाकरे केंद्राची प्रशंसा करण्यात गुंतले आहेत. देशात सध्या 17 ते 18 राज्यांत लोडशेडींग सुरू आहे. पण राज्यातील महाराष्ट्रात वीज वीजवितरण कंपनीने तसेच राज्य शासनाने व मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली परिस्थितीत अत्यंत व्यवस्थितपणे हाताळली जात आहे. मागील काही दिवसापासून आपल्याकडे भारनियमन बंद आहे. भविष्यात देखील भारनियमन होणार नाही, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी गोंदियात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT