Sudhir Mungantiwar Shivendraraje Bhonsle Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantivar cabinet return : सुधीरभाऊ मंत्रिमंडळात कधी परतणार? शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले मोठे संकेत

Shivendraraje Bhosale news : मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठे संकेत दिले. सुधीरभाऊ अनुभवी व अभ्यासू नेते आहेत. उत्कृष्ट संसदपटू आहेत.

Rajesh Charpe

Chanadrapur News : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा मंत्रिमंडळात परतणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यांना विधानसभेचे अध्यक्षपदसुद्धा दिले जाऊ शकते याचीही चर्चा रंगली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठे संकेत दिले. सुधीरभाऊ अनुभवी व अभ्यासू नेते आहेत. उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्यांच्या अनुभवाची सर्वांनाच गरज आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा भाऊंच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

शिवेंद्रराजे भोसले (Shivsendraraje bhosle) यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने एका कार्यक्रमासाठी चंद्रपूर येथे बोलवण्यात आले होते. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी भेट दिली. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी उपरोक्त संकेत दिले. ते म्हणाले आपली भेट फक्त औपचारिक नाही. पक्षातील समन्वय, शिस्त आणि वरिष्ठ नेत्यांबाबत आदरभावाने आपण मुनगंटीवार यांची भेट घेतली.

सुधीरभाऊ फक्त आमदार किंवा माजी मंत्री नाहीत. त्यांची प्रभावशाली शैली आणि विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणातून आम्ही नेहमीच शिकत असतो. अधिवेशनात किंवा मंत्रालयात एखादा विषय येतो तेव्हा त्यावर सुधीरभाऊ यांची काही टिपणी असेल तर तो मंत्री असो वा अधिकारी कोणालाच टाळता येत नाही. त्यांची फाईल रोखण्यापूर्वी सनदी अधिकाऱ्यांनाही विचार करावा लागतो. भाजपमध्ये नेहमीच वरिष्ठ व अनुभवी नेत्यांचा मान राखला जातो असेही भोसले म्हणाले.

यावेळी भाजपचे (BJP) कार्यकर्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावरून आता वेगवेगळे राजकीय तर्क व्यक्त केले जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी अर्थ, वन खात्याचे मंत्री होते. ते भाजपचे प्रदेशाध्यक्षसुद्धा होते. अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळात त्यांच्याकडे सांस्कृतिक खाते देण्यात आले होते.

विदेशातून छत्रपतींची वाघनखे त्यांनी भारतात परत आणली आहेत. महायुतीची पुन्हा सत्ता मंत्रिमंडळात समावेश नसल्याने त्यांना जबर धक्का बसला होता. पावसाळी अधिवेशनात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, आक्रमक भूमिका घेतली होती. यावरून भाजपमध्ये त्यांची कोंडी होत असल्याचे सांगून उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने त्यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT