BJP ShivSena NCP alliance : बहुमतासाठी फक्त आठ आमदार कमी... तरी शिवसेना-राष्ट्रवादीचं ओझं भाजप का वागवतीय? फडणवीस यांची मजबुरी तरी काय?

Mahayuti government Maharashtra news : भाजपने ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत ठरल्याप्रमाणे मानाचे पान दिले आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन आठ महिने झाले आहेत. जनतेने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठे बहुमत दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी केवळ 8 आमदार कमी आहेत. मात्र, त्याही परिस्थितीत महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढली असल्याने भाजपने ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत ठरल्याप्रमाणे मानाचे पान दिले आहे. त्यानंतरही भाजपला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अडचणीत आणण्याची भूमिका घेतली जात असल्याने फडणवीस यांची मजबुरी तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदार महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपकडे 132 जागा मिळाल्या तर सोबतच एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेला 57 जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41जागा मिळाल्या तर चार अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. दुसरीकडे विधानसभेच्या 288 जागांपैकी जवळपास 236 जागा महायुतीला मिळाल्या. तर विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या वाट्याला 46 जागा आल्या. महायुतीने या निवडणुकीत सुफडासाफ करीत विरोधकांची दयनीय अवस्था केली आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
BJP Jaykumar Gore action : रोहित पवारांच्या मतदार संघातील ग्रामपंचायतीवर मंत्री गोरेंची मोठी कारवाई

राज्यात सत्तेत आलेल्या महायुती आघाडीकडे सध्या निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे राज्याचा विकास जोमाने होईल अशी सर्वसामान्यची अपेक्षा आहे. मात्र, राज्यातील सरकार स्थापन करतेवेळीपासून नेहमीच मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला (Bjp) अडचणीत आणण्याचा पर्यंत केला जात आहे. सुरुवातीला खातेवाटपावरून त्यानंतर मंत्रिपदावरून अडचणीत आणण्यात आले. त्यानंतर पालकमंत्रिपद, बंगले, महामंडळ व आता निधीवाटपावरून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
NCP SP Politics : शरद पवारांचा पक्ष भाकरी फिरवणार? कोणाला संधी आणि कोणाला बाहेरचा रस्ता, नव्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशन काळातही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला अडचणीत आणले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्य सरकार बॅकफुटवर गेला आहे. विशेषता गेल्या महिनाभरातील घटनाक्रमामुळे राज्य सरकारसमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. भाजपला बहुमतासाठी फक्त 8 आमदारांची गरज असताना देखील त्यांनी शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सामावून घेतले आहे. यामागे काही राजकीय आणि व्यावहारिक कारणे आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Congress Vs Bjp: काँग्रेस भाजपची झोप उडवणार! 'स्थानिक'च्या निवडणुकांसाठी सपकाळांनी टाकला मोठा डाव; तब्बल 280 जणांची टीम अन्...

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेममुळे भाजपचे सरकार मजबूत संख्याबळासह सत्तेत आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद गमावल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षांतर्गतही दबाव आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मदतीने सत्तेवर राहता येते, त्यामुळे फडणवीस यांना वाटाघाटी करून सत्ता टिकवावी लागत आहे. या दोन्ही पक्षाच्या मदतीमुळेच भाजप सत्तेत आली आहे. त्यामुळे भाजपला या दोन पक्षांना सांभाळून घ्यावे लागते. हे दोन पक्ष फुटले नसते तर मागील पाच वर्ष भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले असते. त्यांनी केलेल्या मदतीचे उपकार भाजपला आणखी काही दिवस तर पाळावे लागणार आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar : अखेर मारहाण झालेल्या विजय घाडगेंना अजितदादांचा मोठा शब्द; मंगळवारी घेणार निर्णय

त्यासोबतच पक्षश्रेष्ठींचे आदेश आणि महाराष्ट्रातील बहुपक्षीय समीकरण लक्षात घेता त्यांना या घटकांबरोबर येत्या काळात काम करावे लागणार आहे. भविष्यातील निवडणुकांची रणनीती शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने करत कार्यकर्त्यांचं बळ भाजपला भविष्यात वाढवायचे आहे. या दोन पक्षाच्या मदतीने भाजपला हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात एकहाती वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यासाठी हे दोन पक्ष भविष्यात उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळेच शिवसेना-राष्ट्रवादीचं ओझं भाजप वागवत आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Manikarao Kokate Vs Bachchu Kadu : रात्रभर ताटकळले पण कृषिमंत्री भेटलेच नाही! बच्चू कडूंना माणिकराव कोकाटेंचा चकवा

भाजपला सत्तेसाठी फक्त 8 आमदारांची गरज असली, महायुती सरकारला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी, राजकीय डावपेच, आणि पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी येत्या काळात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाला सत्तेत ठेवणे ही भाजपसाठी एक प्रकारची मजबुरी आहे आणि त्याचबरोबर हा एक रणनीतीचा भागदेखील आहे. त्यामुळेच या दोन पक्षांना ते वागवत आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Mahayuti strategy change : ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे बलाढ्य महायुतीने बदलली रणनीती? मुंबईत एकत्र लढण्यावाचून पर्यायच नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com