Sunil Mendhe on Vande Bharat Train Sarkarnama
विदर्भ

Vande Bharat Expressला भंडाऱ्यात थांबा मिळणार का? खासदार सुनील मेंढे म्हणाले…

MLC Dr. Parinay Fuke यांनी तेव्हाच ही मागणी केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Vande Bharat Express news ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-विलासपूर या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. पण या गाडीला विदर्भात केवळ एकच थांबा देण्यात आला आहे. भंडारा आणि तुमसर येथेही या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी सातत्याने होते आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी तेव्हाच ही मागणी केली होती.

यासंदर्भात आज दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विलासपूर विभागीय बैठकीच्या नागपूर (Nagpur) येथील विभागीय रेल्वे कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा, (Bhandara) गोंदिया (Gondia) जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) हे या बैठकीचे सभापती होते. रेल्वेसंबंधी असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, आवश्यक तिथे मंत्री स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे खासदार सुनील मेंढे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

नागपूर-विलासपूर वंदे भारत ट्रेनला भंडारा येथे थांबा देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सभापती म्हणून खासदार मेंढे यांनी बैठकीला उपस्थित खासदार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून भंडारा येथे थांबा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे, अशी सूचना केली. त्यामुळे आता वंदे भारतला भंडाऱ्यात थांबा मिळण्याच्या आशा बळावल्या आहेत. वर्षातून एकदा रेल्वेच्या झोन निहाय बैठक घेतली जाते. विलासपूर झोनची बैठक नागपूर विभागीय कार्यालयात घेण्यात आली. बैठकीला विलासपूर झोन मध्ये येणाऱ्या लोकसभा क्षेत्रातील सर्व खासदार आणि या विभागीय महाव्यवस्थापक उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला सभापतींची निवड करण्यात आली. खासदार सुनील मेंढे यांना सभापती म्हणून मान मिळाला. या बैठकीत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. दोन अंतर्गत नवीन लाइन टाकताना वन आणि इतर विभागाच्या येत असलेल्या अडचणी संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. अतिरिक्त रेल्वे मार्गाचे काम या विभागातून केले जाते. हे काम संथ गतीने सुरू असून त्या संदर्भात रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रेल्वे गाड्यांना होणारा उशीर वारंवार सूचना देऊनही कमी होत नाही या संदर्भात सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

दोन्ही जिल्ह्यामध्ये बहुतांश अंडरपासमध्ये पाणी साचून असल्यामुळे प्रवाशांना जाणे-येणे अडचणीचे होते. त्याकरिता इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक मशीन लावण्यात यावे, कोरोना काळात जिल्ह्यातील विविध स्टेशनवर गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. ते थांबे पूर्ववत करण्याकरिता आदेश देण्यात आले. बैठकीच्या शेवटी खासदार सुनील मेंढे यांनी रेल्वे संदर्भातील समस्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ स्तरापर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाव्यवस्थापक आलोक कुमार, विभागीय रेल्वे नियंत्रक मनिंदर उत्पल, खासदार अशोक नेते, खासदार कृपाल तुमाने, खासदार सुरेश धानोरकर तसेच रेल्वेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT