Vande Bharat Express News: विदर्भात हवे वंदे भारतचे तीन थांबे, पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढेल...

वंदे भारतमुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलत आहे.
MLC Dr. Parinay Fuke
MLC Dr. Parinay FukeSarkarnama
Published on
Updated on

Dr.Parinay Fuke :देशातील सर्वाधिक वेगवान आणि सुरक्षित असलेली वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. वंदे भारतमुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलत आहे. विदर्भातील ही पहिली वंदे भारत रेल्वे आहे. त्यामुळे या गाडीकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. पण या गाडीला शेजारच्या छत्तीसगड राज्यात तीन थांबे देण्यात आले, तर विदर्भात केवळ गोंदिया हा एकच थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर ते गोंदिया मार्गावरील हजारो लोकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे गोंदियाच्या व्यतिरिक्त कामठी आणि तुमसर येथेही वंदे भारतला थांबा देण्यात यावा, अशी मागणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना आमदार फुके (MLC Dr. Parinay Fuke) म्हणाले की, वंदे भारत ही पूर्णपणे प्रवासी गाडी आहे. यामध्ये व्यापारी आणि उच्च मध्यमवर्गीय लोक प्रवास करणार आहेत. कामठीतील कॅंटोमेंट हा देशातील सर्वात मोठा कॅम्प आहे. याशिवाय नागपूर (Nagpur) शहराशेजारचे मोठे व्यापारी क्षेत्र म्हणूनही कामठीची ओळख आहे. येथून केवळ ७ किलोमीटरच्या अंतरावर कळमना मार्केट आहे. येथे छत्तीसगडचे (Chhatisgarh) व्यापारी मोठ्या संख्येने येतात. त्यांना नागपूर रेल्वे स्टेशनवर उतरून कळमना जाण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे कामठीला थांबा देणे गरजेचे आहे. कॅन्टोमेंटच्या अधिकाऱ्यांसाठीही या थांब्याने मोठी सुविधा होणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तुमसर तालुका आणि नजीकच्या परिसरातील लोकांचा व्यवसाय हा नागपूरशी निगडित आहे. दररोज हजारोच्या संख्येने व्यापारी नागपूरला आवागमन करतात. विशेष करून शुक्रवारी ही संख्या अधिक असते. कारण या दिवशी तुमसरचा बाजार बंद असतो. त्यामुळे तुमसर आणि कामठीला थांबा दिल्यास व्यापाऱ्यांना सुविधा तर होईलच, पण रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे, असे डॉ. फुके यांचे म्हणणे आहे.

MLC Dr. Parinay Fuke
फडणीसांनी सांगितला, परिणय फुके पालकमंत्री झाल्यावर पहिल्या दौऱ्याचा 'तो' किस्सा..

तुमसर आणि भंडारा धानासाठी प्रसिद्ध आहे. तुमसर आणि भंडाऱ्याचे अंतर ३० किलोमीटर आहे. त्यामुळे तुमसरच्या थांब्यामुळे भंडाऱ्याचे लोकही वंदे भारतशी जोडले जाणार आहेत. कोरोनाच्या नंतर तुमसरमध्ये असलेल्या इतरही गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो, जो खर्चीक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवण्यावर भर आहे आणि नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवायचा असेल, तर कामठी आणि तुमसर येथे वंदे भारतला थांबा देणे गरजेचे आहे, असेही आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com